Drug Trafficking : ड्रग्स तस्करीसाठी नवीन क्लुप्ती, शॅम्पू आणि ऑइल मधून ड्रग्सची तस्करी

116
Drug Trafficking : ड्रग्स तस्करीसाठी नवीन क्लुप्ती, शॅम्पू आणि ऑइल मधून ड्रग्सची तस्करी
Drug Trafficking : ड्रग्स तस्करीसाठी नवीन क्लुप्ती, शॅम्पू आणि ऑइल मधून ड्रग्सची तस्करी
भारतात ड्रग्सची तस्करी (Drug Trafficking) करणाऱ्यासाठी परदेशी तस्कर कॅप्सूल ऐवजी शॅम्पू,हेअर ऑइलच्या पॅकिंगचा वापर करीत आहे.महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) ने मुंबई विमानतळावर नुकत्याच केलेल्या कारवाईत नैरोबी येथून आलेल्या एका केनिया देशातील महिलेला अटक केली आहे. या महिलेकडे मिळून आलेल्या शॅम्पू आणि हेअर ऑइल मध्ये लपवून आणलेले २० कोटी रुपये किमतीचे कोकेन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबई विभागाकडून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनस येथे नैरोबी देशातून भारतात आलेल्या केनियन नागरिक महिलेला संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. तिच्या जवळ असलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली असता तिच्याजवळ मोठ्या प्रमाणात शॅम्पू, हेअर ऑइल आणि सौन्दर्य प्रसादने आढळून आली. डीआयआर च्या अधिकारी यांनी सौन्दर्य प्रसादनची तपासले असता  शॅम्पू  आणि हेअर ऑईलची च्या बॉटल मध्ये असणारे द्रव्य संशयास्पद वाटले म्हणून डीआयआरने ते तपासणीसाठी पाठवले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणजेच त्यात कोकेन हे अमली पदार्थ असल्याचे उघडकीस आली. (Drug Trafficking)
डीआयआरने हे कोकेन ताब्यात घेऊन केनियन महिलेला अटक करून तिच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीआयआर ने जप्त केलेल्या कोकेनचे वजन १किलो ९८३ ग्राम एवढे असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २० कोटी किंमत असल्याची माहिती डी आयआर ने दिली आहे. (Drug Trafficking)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.