Drugs : मुंबईत बेकायदेशीर विक्रीसाठी आणण्यात आलेला २८५ किलो गांजा जप्त; एकाला अटक

36
Drugs : मुंबईत बेकायदेशीर विक्रीसाठी आणण्यात आलेला २८५ किलो गांजा जप्त; एकाला अटक
  • प्रतिनिधी 

मुंबईत बेकायदेशीर विक्रीसाठी परराज्यातून आणलेला २८५ किलो गांजा हा अमली पदार्थ वांद्रे येथून जप्त करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत एकाला अटक केली असून आरोपीवर यापूर्वी देखील अमली पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Drugs)

(हेही वाचा – माँ जिजाऊंच्या पाचाड येथील समाधीस्थळाचा दर्जेदार विकास करावा; भाजपा गटनेते Pravin Darekar यांची मागणी)

इम्रान अन्सारी (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबई गुन्हे शाखा युनिट ९ च्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे पश्चिम रिक्लेमेशन येथील संक्रमण शिबिरातील चाळ क्रमांक ३० खोली क्र. ६ मध्ये मोठ्या प्रमाणात गांजा ठेवण्यात आला असून या गांजाची विक्री ड्रग्ज पेडलर्सना करण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी दुपारी या चाळीत छापा टाकून जवळपास २८६ किलो गांजा हा अमली पदार्थ मिळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी इम्रान अन्सारी याला अटक करून त्याच्या विरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Drugs)

(हेही वाचा – Nagpur Violence: पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवणार; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचा इशारा)

जप्त करण्यात आलेल्या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ७५ लाख रुपये किंमत असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. जप्त करण्यात आलेला गांजा हा स्थानिक ड्रग्स विक्रेते आणि छोटेमोठे ड्रग्ज पेडलर्स यांना विकला जात होता अशी माहिती गुन्हे शाखेने दिली. अटक करण्यात आलेला इम्रान अन्सारी हा सराईत ड्रग्ज डीलर असून तो ताडदेव येथे वास्तव्यास आहे. पूर्वी तो दक्षिण मुंबईतून ड्रग्जचा व्यापार करीत होता. स्थानिक पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर त्याने जाग बदलून वांद्रे रिक्लेमेशन येथील चाळीतून ड्रग्स विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. (Drugs)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.