देशात मागील काही दिवसांपासून अमली पदार्थ (Drug Case) तस्करींच्या घटना वाढत आहेत. या छुप्या मार्गाने येणाऱ्या अमली पदार्थापासून तरुण वर्ग मोठ्या प्रमणात व्यसनाकडे ओढला जातोय. दरम्यान, भारतात अमली पदार्थांच्या तस्करीचा गोरखधंदा वेगाने वाढत आहे. भारतात येणाऱ्या अमली पदार्थांपैकी जवळपास ४०% हिश्श्याची स्थानिक बाजारात विक्री होते. मात्र उरलेले ६०% ड्रग्ज भारतातून अरब आणि आफ्रिकेत (Africa Drug case) जात आहे. तसेच अमली पदार्थासंदर्भात इंटरनॅशनल नार्कोटिक कंट्राेल ब्यूरो (International Narcotic Control Bureau) अर्थात आयएनसीबी म्हणते की, भारत ड्रग्ज पुरवठ्याचा सहजसुलभ मार्ग बनल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. (Drug Case)
दरम्यान, भारतात एनसीबीपासून इतर केंद्रीय संस्था यावर अंकुश ठेवण्यासाठी सतत कारवाई करत आहेत. आतापर्यंत युरोप-अमेरिकेला (Europe-America drug case) विक्रीचे सर्वात मोठे मार्केट मानले जात असे. मात्र आता अरब देश इमर्जिंग मार्केटच्या रुपाने पुढे येत आहेत. येथे जवळपास २ लाख कोटी रुपयांचा ड्रग्ज पुरवठा होतो. अरब देशात सक्रिय भारतीय आणि पाकिस्तानी गुन्हेगारांची टोळी हे ड्रग तिथे विकतात.आफ्रिकी देशातही विक्री केली जाते. या व्यवसायामुळे आफ्रिकेत नार्को टेररचे जाळे विस्तारत आहे. राजकीयदृष्ट्या अस्थिर अनेक आफ्रिकी देशांत ड्रग्जच्या पैशांतून बंडखोरांचे पेव फुटले आहे. तसेच अमली पदार्थ पुरवठा करणारे पुरवठादार हे रस्त्या मार्गे पुरवठा करण्यात जास्त धोका असल्यामुळे समुद्रमार्गे फिश ट्रेलर आणि कार्गो जहाजांचा वापर मोठ्या प्रमणात करतात.
(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy : दुसऱ्या ॲडलेड कसोटीसाठी रविचंद्रन अश्विन भारतीय संघात?)
भारतात अमली पदार्थांचे एंट्री पॉइंट म्हणून गुजरात, महाराष्ट्र आणि केरळ किनारे तसेच पूर्वोत्तर राज्यांतील म्यानमारच्या सीमाभाग ओळखला जातो, मणिपूरमध्ये मोरेह आणि मिझोराममध्ये चंपई हे मोठे केंद्र आहेत. येथे स्थानिक विक्रीसह इतर भागातही पुरवठा होत आहे.
हेही पाहा –