पालघर जिल्ह्यात (Palghar District) पोलिसांनी तब्बल 2.42 कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन (MD) हे अमली पदार्थ जप्त (Palghar drugs seized) केले आहेत. यासोबतच पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे, संबंधित तरुण हा आपल्या घरातच हे ड्रग्ज तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (Drugs case)
मिळलेल्या माहितीनुसार, पालघरच्या बोईसर (Palghar Boisar drug case) भागात एका घरात बेकायदेशीर ड्रग्ज तयार केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, शुक्रवारी रात्री उशिरा विशेष पोलिस पथकाने छापा टाकला. यामध्ये मेफेड्रोन व्यतिरिक्त, पोलिसांनी तेथून ड्रग्ज बनवण्याचे उपकरण देखील जप्त केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन मुराद असे अटक करण्यात आलेला आरोपीचे नाव आहे, जो रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवीधर आहे. आरोपीने त्याचे घर ड्रग्ज लॅबमध्ये रूपांतरित केले होते आणि तेथे तो बेकायदेशीरपणे मेफेड्रोन बनवत होता.
(हेही वाचा – PM Narendra Modi यांची काँग्रेसवर जोरदार टीका; म्हणाले, काँग्रेसने शून्याची…)
एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पालघरचे डीएसपी विकास नाईक (Palghar DSP Vikas Naik) म्हणाले की, आरोपीविरुद्ध एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे काही साथीदार होते का, तो कोणाला ड्रग्ज पुरवत होता आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल तो कुठून आणत होता हे आता पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच पोलीस संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पालघर आणि आसपासच्या परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीवर कडक नजर ठेवली जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आरोपी हा कोणत्याही मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा भाग होता का की तो एकटाच हा बेकायदेशीर व्यवसाय चालवत होता हे देखील पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community