- प्रतिनिधी
अमली पदार्थ विरोधी पथकाने मालाड मालवणीमधून सव्वा कोटी रुपयांचा ‘हेरॉईन’ हा अमली पदार्थ (Drugs) जप्त केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दोन कोटी ३७ लाख ६० हजार किंमत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे उत्तराखंड राज्यातील असून मालवणी येथे स्थानिक अमली पदार्थ विक्रेत्यांच्या मागणीनुसार हेरॉईनची खेप घेऊन मालवणी येथे आले होते अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.
(हेही वाचा – ‘कितीही शिकले तरी मानसिकता जिहादीच’; Jitendra Awhad यांना नेटकऱ्यांनी सुनावले)
मालाड मालवणी येथे काही इसम अमली पदार्थांची (Drugs) डिलेव्हरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी अमली पदार्थ विरोधी पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून चार जणांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळ असणाऱ्या बॅगेची तपासणी केली असता बागेत हेरॉईन हा अमली पदार्थ (Drugs) आढळून आला. अमली पदार्थ विरोधी पथकाने या चौघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक चौकशीत हे चौघे उत्तराखंड राज्यातील असून चौघेही अमली पदार्थांच्या (Drugs) तस्करी करणाऱ्या टोळीचा एक भाग आहे.
(हेही वाचा – सुनेला टोमणे मारणे, टीव्ही पाहू न देणे क्रूरता नाही; Bombay High Court चा निर्णय)
मुंबईतील मालवणी हा परिसर अमली पदार्थांचा (Drugs) हब असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे लहान मोठे विक्रते असून, हे विक्रेते गल्लीबोळात ड्रग्जची विक्री करतात. अटक करण्यात आलेले आरोपीनी येथील ड्रग्ज (Drugs) विक्रेत्याच्या मागणीनुसार हेरॉईन हे अमली पदार्थांचा साठा घेऊन आले होते, व हे हेरॉईन येथील ड्रग्स विक्रेत्यांना देण्यात येणार होते. तत्पूर्वी या चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांच्या अटकेनंतर मालवणीत ड्रग्ज विक्रेते तसेच ड्रग्ज (Drugs) माफिया हे भूमिगत झाले असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community