गोवंडी शिवाजी नगरातील Drugs माफियांनी पोक्सो कायद्याला बनवले शस्त्र
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार बुट्टू सिकंदर हा अल्पवयीन मुलांना Drugs चे व्यसन लावून त्यांच्यामार्फत अमली पदार्थ विरोधात आवाज उठविणाऱ्यावर हल्ले घडवून आणतो.
पूर्व उपनगरातील मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा क्षेत्रात ‘अमली पदार्थ’ हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) उमेदवार नवाब मलिक यांनी मानखुर्द – शिवाजी नगरला ‘अमली पदार्थ मुक्त करू’ अशी घोषणा देऊनच प्रचाराचा नारळ फोडला आहे. नवाब मलिक यांच्या घोषनेनंतर गोवंडी शिवाजी नगरातील Drugs माफिया सावध झाले आहे. त्यांनी पोलीस यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही बसवले आहे, तसेच लहान मुलांचा वापर करून Drugs माफिया विरोधात आवाज उठवणाऱ्यावर पोक्सो कायद्याला हत्यार बनवून वापरले जात असल्याचा धक्कादायक आरोप स्थानिकाकडून केला जात आहे.
पूर्व उपनगरातील मानखुर्द-शिवाजी नगर, बैगण वाडी येथे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री सुरू आहे. गांजा, चरसपासून एमडी कोडीन कफ सिरप, बटन (नशेच्या गोळ्या) विकणारे गल्लोगल्ली, नाक्यानाक्यावर आढळून येतात. या ठिकाणी Drugs माफियाकडून गुंडांना पोसले जाते, त्यांच्या मार्फत अमली पदार्थ विक्री विरोधात आवाज उठविणाऱ्यावर हल्ले केले जातात. मागील महिन्यात बुट्टू सिकंदर लगडा या Drugs माफियाने एका १७ वर्षाच्या मुलावर हल्ला घडवून त्याची हत्या केल्याची घटना घडली होती.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार बुट्टू सिकंदर हा अल्पवयीन मुलांना Drugs चे व्यसन लावून त्यांच्यामार्फत अमली पदार्थ विरोधात आवाज उठविणाऱ्यावर हल्ले घडवून आणतो, बुट्टू सिकंदर विरोध करणाऱ्यावर बट्टू हा अल्पवयीन मुलांना सावजासारखा वापर करून त्यांना विरोध करणाऱ्यावर लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात पाठवत असे व पोक्सो कायद्याचा गैरवापर करीत असे, अनेक पोक्सोच्या गुन्ह्यात हा प्रकार समोर आला असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.
बट्टूचे घर आणि Drugs चे अड्डे अशा ठिकाणी आहेत की, त्या ठिकाणी पोलिस पोहचण्यापूर्वी बट्टूला पोलीस येत असल्याची माहिती मिळत असे, त्यासाठी त्याने खास व्यवस्था केली आहे, त्याने पोलीस येण्याच्या वाटेवर सीसीटीव्ही लावून ठेवले आहे आणि या सीसीटीव्हीसाठी एका झोपड्यात सीसीटीव्ही कंट्रोल रूम तयार करून त्या ठिकाणी एक व्यक्ती पाळतेवर ठेवली आहे. पोलीस येताना कॅमेरात दिसले की कंट्रोल रूममधील व्यक्ती बुट्टूला खबर पोहचत असे, अमली पदार्थाच्या वादातून झालेल्या हत्येनंतर पोलीस आणि मनपाने सीसीटीव्ही कॅमेरे उदध्वस्त करण्यात आले आहे. बुट्टू सारखे अनेक Drugs माफिया शिवाजी नगर, देवनार आणि मानखुर्द परिसरात अमली पदार्थाचा व्यवसाय करीत आहे.