आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबी अर्थात अंमली पदार्थ विरोधी विभागाचे मुंबईचे माजी प्रादेशिक अधिकारी समीर वानखेडेंच्या आता अडचणी वाढताना दिसत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने काही दिवसांपूर्वी वानखेडेंच्या गोरेगावच्या घरी धाड टाकली होती. त्यानंतर आता सीबीआयने समीर वानखेडेंचा मोबाईल जप्त करण्यात आल्याची महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. वानखेडे यांच्यासोबत एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांचे देखील फोन जप्त करण्यात आले आहे.
(हेही वाचा – आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये; मंत्रिमंडळाचा निर्णय)
माहितीनुसार, समीर वानखेडेंसह एनसीबीचे बडतर्फ अधिकारी विश्वविजय सिंग, आशिष रंजन यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या फोनचे तांत्रिक विश्लेषण केले जाणार आहे. तत्पूर्वी वानखेडेंच्या गोरेगावच्या घरी ज्यावेळेस धाड टाकण्यात आली होती, त्यावेळी वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांचा फोन जप्त करण्यात आला होता.
दरम्यान १८ मेला समीर वानखेडे यांची सीबीआय पथक चौकशी करणार आहे. या चौकशीपूर्वी सीबीआयकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community