शिक्षणाच्या नावाखाली भारतात येऊन बेकायदेशीर ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्या नायजेरियन नागरिकांनी नवी मुंबईत (Navi Mumbai Kharghar Drug Case) ड्रग्जच्या पार्ट्याचे आयोजन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईतील खारघर येथे रो-हाऊस (row house) भाड्याने घेऊन त्यात कम्युनिटी किचन तयार करून ड्रग्जच्या पार्ट्या करणाऱ्या २१ नायजेरियन नागरिकांना मंगळवारी नवी मुंबई (Navi Mumbai) पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी या पार्टीमधून जवळपास २७ लाख रुपयांचा अमली पदार्थ आणि मोठ्या प्रमाणात मद्याच्या बॉटल जप्त केल्या आहेत. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेल (ANC) आणि मानवी तस्करी विरोधी युनिट (AHTU) यांनी हा छापा टाकला, या पथकात जवळपास दीडशे पोलिसांचा समावेश होता. (Drugs Party)
नवी मुंबईतील खारघर (Kharghar Drugs Party) सेक्टर १२ या ठिकाणी असलेल्या रो-हाऊसमध्ये नायजेरियन नागरिकांसाठी लेमन किचन आणि जेमिनी किचन नावाच्या दोन कम्युनिटी किचन तयार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही कम्युनिटी किचनचा वापर नवी मुंबईत राहणारे नायजेरियन नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. हे दोन्ही कम्युनिटी किचन एक आफ्रिकन महिला चालवत होती. सोमवारी रात्री या दोन्ही रो-हाऊसमधून कम्युनिटी किचनमध्ये ड्रग्ज आणि दारूची पार्टी सुरू असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेल (ANC) आणि मानवी तस्करी विरोधी युनिट (AHTU) यांनी जवळपास दीडशे पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे या दोन्ही कम्युनिटी किचनवर एकाच वेळी छापा टाकून ६ महिलांसह २० नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले, हे सर्व जण ड्रग्जच्या नशेत झिंगलेले होते. तसेच पोलिसांनी दोन्ही कम्युनिटी किचन मधून सव्वा कोटींचा अमली पदार्थ आणि मद्याच्या बॉटल मोठ्या प्रमाणात जप्त केल्या आहेत. (Drugs Party)
“आम्हाला एका आफ्रिकन महिलेने चालवलेल्या या कम्युनिटी कॅन्टीनमध्ये ड्रग्ज आणि अल्कोहोल पार्टीची एक सूचना मिळाली होती. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला आणि पार्टीत ड्रग्ज जप्त केल्यानंतर कम्युनिटी किचन चालविणाऱ्या महिलेवर गुन्हाही नोंदवला, असे अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एएनसी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी सांगितले. या पार्टीतून २६.६६ लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन ड्रग्ज आणि २२ हजार रुपये किमतीचे अल्कोहोल असा एकूण २६ लाख ८० हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ आणि मद्य जप्त करण्यात आले. या पार्टीतून २० नायजेरियन पुरुष आणि महिलांना अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा – BJP: महापालिका निवडणूक स्वबळावरच? भाजपाचा बंडखोरांना संदेश)
खारघरमधील ज्यारो-हाऊसमध्ये कम्युनिटी किचन चालवले जात होते ते भाड्याने देणाऱ्या मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशी नागरिकांना जागा भाड्याने देताना मालकांनी काही प्रोटोकॉल आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्यात वैध पासपोर्ट, वैध भाडे करारासह सी फॉर्म इमिग्रेशन कार्यालयात सादर करणे यासारखी कागदपत्रे सादर करणे समाविष्ट आहे.” परंतु त्यांनी याची पूर्तता केली नसल्याचे समोर आल्याने रो-हाऊस मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडे यांनी दिली. २० पैकी सात आरोपींना महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 65 ई), विदेशी कायदा कलम 14 (ए) (सी) आणि वैध व्हिसा नसल्याबद्दल विदेशी नोंदणी कायदा कलम 5 अन्वये अटक करण्यात आली. उर्वरित परदेशी नागरिकांवर अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल नार्कोटिक्स ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट (एनडीपीएस) 1985 कलम 8(के) आणि 22 (के) आणि 29 अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : उबाठाचे गटप्रमुख ५ नोव्हेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर, ‘या’ भागातून करणार सुरुवात )
दरम्यान, अन्य एका घटनेत मानवी तस्करी विरोधी युनिट (AHTU) यांनी उलवे येथून आणखी एका नायजेरियनला ४१० ग्रॅम कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केली. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे १.०२ कोटी रुपये किंमत आहे. “२०१९ मध्येही त्याला ठाणे पोलिसांनी अशाच एका गुन्ह्यात अटक केली होती, आता पुन्हा त्याने या गुन्ह्याची पुनरावृत्ती केल्याचे निष्पन्न झाले आहे,” असे एएचटीयूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे (Prithviraj Ghorpade) यांनी सांगितले. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर आरोपीला मंगळवारी त्याच्या उलवे येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्जच्या स्त्रोताचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community