Drugs Racket Exposed : पोलिसांकडून अजून एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश

111
Drugs Racket Exposed : पोलिसांकडून अजून एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश

राज्यात ड्रग्ज विरोधी तपासाला गती आली आहे. सोलापूर, नाशिक, संभाजी नगर नंतर आता पोलिसांनी पालघर जिल्ह्यात मिराभाईंदर गुन्हे शाखेने एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. ड्रग्ज (Drugs Racket Exposed) बनवण्यासाठीचा कच्चा माल देखील या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिक पाठोपाठ मुंबई पोलिसांनी (Drugs Racket Exposed) सोलापुरात कारवाई करून ११६ कोटी रुपये किमतीचा एमडीसह कच्चा माल जप्त केल्याची घटना घडली. नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात एमडी बनविण्याचे कारखाने आढळून आले असून येथून मोठ्या प्रमाणात एमडी या अमली पदार्थाची तस्करी सुरू होती अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या युनिटने ही कारवाई केली आहे.

(हेही वाचा – IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात जेव्हा प्रेक्षक महम्मद शामीच्या नावाचा गजर करतात…)

मुंबई गुन्हे शाखा (Drugs Racket Exposed) कक्ष ९ च्या पथकाने एमडी या अमली पदार्थाची डिलिव्हरीसाठी आलेल्या दोन जणांना खार परिसरातून अटक केली होती. या दोघांजवळ गुन्हे शाखेला १० कोटी १७ लाख रुपये किमतीचा एमडी हा अमली पदार्थ मिळून आला होता. या दोघांच्या चौकशीत सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी परिसरात एका कारखान्यात एमडी हा अमली पदार्थ तयार करून त्याची तस्करी केली जात असल्याचे समोर आले. (Nashik Drugs)

तर दुसरीकडे राज्यात सध्या ड्रग्ज माफिया (Drugs Racket Exposed) ललित पाटील हे प्रकरण रोज नवनवीन वळण घेत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.