नांदेड येथून मुंबईत येणारा गांजा हा अमली पदार्थ अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे रोखण्यास ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ (NCB) मुंबई विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे. १२५ किलो गांजासह अमली पदार्थ विरोधी पथकाने ४ तरुणांना अटक केली असून त्यांच्याजवळील स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील महामार्गावर करण्यात आली आहे. (Drugs Seized)
(हेही वाचा- Delhi Water Crisis: जलमंत्री अतिशी यांचे बेमुदत उपोषण हे राजकीय षडयंत्र! जाणून घ्या कसे)
नांदेड (Nanded) जिल्ह्यातून मुंबईकडे (Mumbai) मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ (एनसीबी)ला मिळाली होती. एनसीबीने रविवारी पहाटे नांदेड येथून अमली पदार्थ घेऊन निघालेल्या एका स्विफ्ट कारचा पाठलाग केला. ही कार अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी (Pathardi) तालुक्यात असणाऱ्या करंजी गावाजवळ असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दगडवाडी फाटा या ठिकाणी अडविण्यात आली. एनसीबीने कारमध्ये असणाऱ्या चार तरुणांना ताब्यात घेऊन कारची तपासणी केली असता १२५ किलो गांजा हा अमली पदार्थ आढळून आला.(Drugs Seized)
कारसह चारही संशयित तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस पथक मुंबईकडे रवाना झाले. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील अनेक महिन्यांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात गांजा या अमली पदार्थाची तस्करी सुरू होती. या तस्करीबाबत एनसीबीच्या मुंबई विभागाच्या पथकाला माहिती मिळाली असता पोलीस पथकाने तस्करी करणाऱ्याची माहिती मिळवून त्यांच्यावर पाळत ठेवली होती. शनिवारी रात्री नांदेड येथून मुंबईकडे गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच एनसीबीचे पथक नांदेड येथे रवाना झाले. एनसीबीच्या पथकाने एका संशयित स्विफ्ट कारचा पाठलाग सुरू केला. (Drugs Seized)
(हेही वाचा- CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे रात्री उशिरा अचानक दिल्लीला रवाना, नंतर नागपुरात; मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा)
पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण स्विफ्ट कारमधील तस्करांना लागताच त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मुंबईत (Mumbai) गांजाची तस्करी कुठे करण्यात येणार होती, याबाबत या तरुणांकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. (Drugs Seized)
हेही पहा-