Drugs Seized : डोंगरीतून इम्रान याकूब शेखला कोट्यवधीच्या कोकेनसह अटक

198
Drugs Seized : डोंगरीतून इम्रान याकूब शेखला कोट्यवधीच्या कोकेनसह अटक
Drugs Seized : डोंगरीतून इम्रान याकूब शेखला कोट्यवधीच्या कोकेनसह अटक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या डोंगरीतुन अमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी डोंगरीतून दाऊदचा साथीदार दानिश चिकना याला ड्रग्सविक्री प्रकरणी अटक केल्यानंतर डोंगरी पोलिसांनी मंगळवारी डोंगरीतुन इम्रान याकूब शेख याला साडेचार कोटींच्या कोकेन या अमली पदार्थासह अटक केली आहे. (Drugs Seized)
इम्रान याकूब शेख हा एका बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून नोकरीला असून डोंगरी येथील सिद्धी मोहल्ला, रज्जाक बिल्डिंग येथे राहणारा आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी गेल्या आठवड्यात ड्रग्स प्रकरणात  दाऊद टोळीचा  दानिश चिकना याला अटक केल्यानंतर डोंगरी पोलिसांनी येथील ड्रग्स माफियावर लक्ष केंद्रित केले होते. डोंगरी पोलीस ठाण्याचे  सहायक पोलिस निरीक्षक परिमल पाटील यांच्यासह हवालदार पी.एच. मुलाणी आणि पी.एस. शिंदे हे सुपारीवाला बिल्डिंग, निशानपाडा क्रॉस लेनजवळ गस्त घालत असताना त्यांना एक संशयास्पद मोटारसायकल त्यांना आढळून आली. गस्तीवरील पोलिसांनी मोटारसायकल जवळ असलेल्या  संशयिताकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांना बघून पळून जाण्याचा प्रयत्न केला. (Drugs Seized)
पोलिसांनी त्याला मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तसेच त्याच्या मोटारसायकलची डिक्की तपासली असता डिक्कीत पोलिसांना ९४० ग्राम कोकेन हे अमली पदार्थ आढळून आले. पोलिसांनी कोकेन सह ताब्यात घेण्यात आलेल्या इम्रान याकूब शेख याला2 पोलीस ठाण्यात आणून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. (Drugs Seized)
इम्रान हा कोकेन या अमली पदार्थाची डिलिव्हरी देण्यासाठी निघाला होता, मात्र वाटेतच त्याला1 पोलिसांनी ताब्यात घघेऊन त्याला अटक करण्यात आली, इम्रान हा डोंगरीतील एका बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयात ऑफिस2 बॉय म्हणून काम करतो, त्याने कोकेन कुठून आणले होते व ते कुणाला देण्यात येणार होते याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Drugs Seized)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.