Drugs Seized : गुजरात किनाऱ्यावर जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जच्या साठ्याचे इराण कनेक्शन ?

Drugs Seized : जप्त केलेल्या ३३०० किलो अमली पदार्थांमध्ये ३०८९ किलो चरस, १५८ किलो मेथॅम्फेटामाइन, २५ किलो मॉर्फिनचा समावेश आहे. पुणे आणि दिल्लीत झालेल्या कारवायांसह सुमारे ७,५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.

200
Drugs Seized : गुजरात किनाऱ्यावर जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जच्या साठ्याचे इराण कनेक्शन ?
Drugs Seized : गुजरात किनाऱ्यावर जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जच्या साठ्याचे इराण कनेक्शन ?

गुजरातलगत अरबी समुद्रात भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि अमली पदार्थ विरोधी यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे. एका इराणी जहाजातून ३३०० किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. (Drugs Seized) या प्रकरणी पाच विदेशी नागरिकांना अटक केली. हे नागरिक पाकिस्तानी किंवा इराणी असल्याचे बोलले जात आहे. समुद्रात केलेल्या कारवाईत प्रथमच इतका मोठा साठा जप्त करण्यात आला.

(हेही वाचा – Sandeshkhali Case : अत्याचारी शाहजहान शेखच्या मुसक्या आवळल्या; पश्चिम बंगाल पोलिसांनी केली अटक)

आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेवर (आयबीएमएल) अरबी समुद्रात वेरावल बंदरापासून २ किलोमीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली. पाचही तस्कर इराणी जहाजावर होते. जप्त केलेल्या ३३०० किलो अमली पदार्थांमध्ये ३०८९ किलो चरस, १५८ किलो मेथॅम्फेटामाइन, २५ किलो मॉर्फिनचा समावेश आहे.

७ दिवसांत ७,५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे २ हजार कोटी रुपये आहे. गेल्या ७ दिवसांत अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पुणे आणि दिल्लीत झालेल्या कारवायांसह सुमारे ७,५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.

नौदल, अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (Narcotics Control Bureau, NCB), गुजरात पोलिस (Gujarat Police) यांनी केलेल्या संयुक्त कारवाईला ऐतिहासिक स्वरूपाचे यश मिळाले आहे. देशाला अमली पदार्थांपासून मुक्त करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट असून त्यानुसार ही पावले उचलण्यात आली आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सांगितले.

ते ५ जण पाकिस्तानी कि इराणी ?

अमली पदार्थविरोधी पथकाने सांगितले की, आंतरराष्ट्रीय टोळीकडून समुद्रमार्गे तस्करी करण्यात आलेला आजवरचा सर्वांत मोठा अमली पदार्थांचा साठा पकडण्यात आला. अटक केलेले पाच जण इराण किंवा पाकिस्तानचे नागरिक असल्याचा संशय आहे. (Drugs Seized)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.