दिल्ली पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज (Drugs) रॅकेटचा भंडाफोड केला आहे. पोलिसांनी 560 किलोंहून अधिक कोकेन जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत 2 हजार कोटींहून अधिक आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
(हेही वाचा – RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला परवानगी द्या, मद्रास उच्च न्यायालय)
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दक्षिण दिल्लीत कारवाई करत ही कोकेनची खेप हस्तगत केली आहे. पोलिसांनी तब्बल 560 किलोहून अधिक वजनाच्या या अंमलीपदार्थांची आंतरराष्ट्रीय बजारपेठेत 2 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे या कारवाईनंतर पोलिसांचेही डोळे विस्फारले गेलेत. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. (Drugs)
(हेही वाचा – Sanjay Raut यांची नेटकऱ्यांनी का उतरवली?)
तसेच जप्त केलेले अंमली पदार्थ कोणासाठी नेण्यात आले होते, ते कोणाकडे पोहोचवले जाणार होते, या टोळीशी कोणाचे संबंध आहेत, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहे. दिल्लीतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कोकेन जप्ती आहे. कोकेन हे अंमली पदार्थ हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये वापरले जाणारे ड्रग्ज (Drugs) आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community