-
प्रतिनिधी
नवी मुंबई शहर हे अमली पदार्थांचे (Drugs) हब होत आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांकडून अमली पदार्थांचा बेकायदेशीररित्या धंदा सुरू असल्याचे नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आलेले असताना, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई युनिटने नवी मुंबईतून नुकतेच २०० कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे. एनसीबीच्या या कारवाईतून आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या एका मोठ्या अमली पदार्थ तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईत ११.५४ किलोग्रॅम उच्च दर्जाचे कोकेन या अमली पदार्थाचा समावेश आहे. एनसीबीने या प्रकरणी सिंडिकेटच्या चार संशयित सदस्यांना देखील अटक केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई एनसीबी युनिटच्या कामगिरीचे कौतुक केले असून त्यांनी त्यांच्या ‘एक्स खात्यावर ट्विट करून “मुंबईत उच्च दर्जाचे कोकेन, गांजा जप्त करण्यात आणि चार जणांना अटक करण्यात यश आले, पंतप्रधान श्री @narendramodi जी यांचे ड्रग्जमुक्त भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अवलंबलेल्या वरपासून खालपर्यंतच्या तपासाच्या दृष्टिकोनाच्या यशाचे हे द्योतक आहे. या मोठ्या यशाबद्दल @narcoticsbureau टीमचे अभिनंदन,” असे शाह यांनी X वरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Bharat crushes drug cartels with zero tolerance.
A major breakthrough in Mumbai in seizing very high-grade cocaine, ganja, and cannabis gummies and arresting four people. It is a testament to the success of the top-to-bottom approach to investigation adopted to make PM Shri…
— Amit Shah (@AmitShah) February 7, 2025
(हेही वाचा – Delhi Assembly Results : ‘भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्ध्वस्त…’ ; भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर अमित शाहांचे ट्विट)
११.५४ किलो कोकेन व्यतिरिक्त, एनसीबी पथकाने ४.९ किलो हायड्रोपोनिक गांजा आणि २०० पॅकेट (सुमारे ५.५ किलो वजनाचे) गांजा जप्त केला. या सिंडिकेटने जप्त केलेले हे अमली पदार्थ बेकायदेशीर मार्गांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) मधून आणल्याचा दावा एनसीबीच्या सूत्रांनी केला आहे. ३१ जानेवारी रोजी नवी मुंबईतील एका निर्जन ठिकाणावरून एनसीबीने हा अवैध पदार्थ जप्त केला. कुरिअर कंपनी कडून जप्त केलेल्या पार्सलमध्ये २०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आल्याची विशिष्ट गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. एनसीबीला मिळालेल्या माहितीनुसार हा अमली पदार्थ (Drugs) ऑस्ट्रेलियात एका सिंडिकेटच्या एका व्यक्तीकडे पोहचविण्यात येणार होता. एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटला नवी मुंबईतील एका ठिकाणी लपवून ठेवलेल्या ठिकाणाहून हा साठा जप्त करण्यात आला होता” असे एनसीबीच्या एका सूत्राने सांगितले. सुरुवातीच्या चौकशीत असे दिसून आले की हे सिंडिकेट परदेशात असलेल्या काही भारतीय संशयितांकडून चालवले जात होते. जप्त केलेल्या तस्करीचा काही भाग सिंडिकेटने अमेरिकेतून आणल्याचा आरोप आहे, परंतु ते कुरिअर/लहान कार्गो सेवा आणि मानवी तस्कराद्वारे भारतात आणि परदेशात अनेक रिसीव्हर्सना पाठवण्यासाठी होते, असे सूत्रांनी सांगितले.
एनसीबीच्या तपासात असे दिसून आले की हे सिंडिकेट काटेकोरपणे गरजेच्या आधारावर काम करत होते आणि अमली पदार्थविरोधी अपथकाला त्याचा शोध लागू नये म्हणून ते कोड वर्ड (सांकेतिक) शब्द वापरत होते. “या प्रकरणात सहभागी असलेले लोक एकमेकांसाठी अनोळखी आहेत आणि ते अमली पदार्थांच्या (Drugs) व्यवहाराशी संबंधित दैनंदिन संभाषणासाठी सांकेतिक भाषेचा वापरत करीत होते,” असे एका सूत्राने सांगितले. सिंडिकेटशी संबंधित इतर आरोपींना पकडण्यासाठी एनसीबी पुढील तपास करत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community