इराणहून आलेल्या बोटीतून तब्बल ४२५ कोटींचे ड्रग्ज जप्त! एटीएस आणि कोस्टगार्डची संयुक्त कारवाई

गुजरातमध्ये इराणहून आलेली संशयास्पद बोट पकडण्यात आली असून या बोटीमधील तब्बल 425 कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. गुजरात एटीएस आणि कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. या बोटीतील 5 जणांना सुद्धा अटक करण्यात आली आहे.

( हेही वाचा : चीनच्या कुरापती सुरूच…मोबाईलद्वारे हेरगिरी! भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला धोक्याचा इशारा )

425 कोटी किंमतीचे 61 किलो हेरॉइन

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ओखाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एटीएस आणि कोस्टगार्डने इराणहून आलेली एक संशयास्पद बोट पकडली आहे. या बोटीची तपासणी केली असता त्यामध्ये 425 कोटी किंमतीचे 61 किलो हेरॉइन आढळून आले. या बोटीतून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खबऱ्याने माहिती दिल्याप्रमाणे शहरात मोठ्या प्रमाणात हेरॉइन येणार अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार ही संयुक्तपणे कारवाई करण्यात आली आहे. ओखा समुद्रकिनाऱ्यापासून तब्बल 340 किलोमीटर दूर अंतरावर एक संशयित बोट आढळून आली. गस्तीवर असलेल्या कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनी बोटीला थांबण्याची सूचना केली. पण, या बोटीने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाठलाग करून या बोटीला पकडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here