Drugs : मुंबईत ४८४ कोटींचे अमली पदार्थ जप्त, १ हजार जणांना अटक; मागील नऊ महिन्यांतील कारवाई

86
Drugs : मुंबईत ४८४ कोटींचे अमली पदार्थ जप्त, १ हजार जणांना अटक; मागील नऊ महिन्यांतील कारवाई
  • प्रतिनिधी 

शहरासह उपनगरात अमली पदार्थ (Drugs) विक्री आणि सेवन करण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे मुंबई पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी जानेवारी २०२४ ते सप्टेंबर २०२४ या नऊ महिन्यांत केलेल्या कारवाईत एकट्या मुंबईतून ४८४ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे, तसेच या प्रकरणात जवळपास १ हजार जणांना अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – विदर्भातील जागा कमी करणे, Congress ला पडू शकते अडचणीचे ?)

पोलिसांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबईत मागील ९ महिन्यांत ४८४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ (Drugs) जप्त करण्यात आले आहे. मुंबईतील विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईत १०१० जणांना अमली पदार्थ विक्री प्रकरणी अटक करण्यात आली असून ८६० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय, अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी ५ हजार ९० जणांना अटक करण्यात आली आहे. ही आकडेवारी जानेवारी २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीतील आहे. मागील वर्षी २०२३ मध्ये १ हजार ४०१ गुन्हे दाखल करण्यात आले होते, आणि १ हजार ७१४ जणांना अटक करण्यात आली होती. वर्षाभरात ४१३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ (Drugs) जप्त करण्यात आले आहे. २०२३ मध्ये पोलिसांनी ९ हजार ९३३ जणांवर अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

(हेही वाचा – Dharavi Assembly Constituency : घराणेशाहीसाठी गायकवाड रडल्या, माझी धारावी मला द्या!)

गेल्या नऊ महिन्यांत सर्वाधिक गांजा या अमली पदार्थाचे (Drugs) ५३८ गुन्हे दाखल करण्यात आली आहे. त्यात ५६१ जणांना अटक केली असून २.५६ कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. एमडीशी संबंधित १९१ गुन्हे दाखल करण्यात आले, त्यात २७५ लोकांना अटक करण्यात आली आणि ४४९ कोटी रुपयांची एमडी जप्त करण्यात आली. चरसचे ३४ गुन्हे दाखल करण्यात आली त्यात ३७ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हेरॉईनचे २८ गुन्हे आणि कोकेनचे १२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, अनुक्रमे ४० आणि १८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ७.४१ कोटी रुपयांचे हेरॉईन आणि १२.३ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.