-
प्रतिनिधी
शहरासह उपनगरात होणारे रस्ते अपघात टाळण्यासाठी तसेच मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यावर चाप बसविण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालकांवर (Drunk Driver) दंडात्मक कारवाई न करता थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. ४ एप्रिल ते ६ एप्रिल या दोन दिवसांच्या कालावधीत मुंबई वाहतूक विभागाने २२ मद्यपी चालकांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याचसोबत या चालकांचे वाहन परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमुळे मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या दारुड्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे.
(हेही वाचा – World Health Day : गर्भवती महिलांच्या मार्गदर्शनासाठी महापालिकेचा ‘माँ-मित्र हेल्पडेस्क’)
मुंबई शहरासह उपनगरात बहुतांश रस्ते अपघात मद्यप्राशन करून वाहन चालविल्यामुळे होत असल्यामुळे या दारुड्या वाहनचालकांवर चाप बसविण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या आठवड्यात महत्त्वाचा निर्णय घेतला होता. मद्यपी वाहन चालकांवर (Drunk Driver) दंडात्मक कारवाई न करता त्यांच्यावर थेट संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांचे वाहन परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या आठवड्यापासून या निर्णयाची अंलबजावणी करण्यास सुरुवात केली असून मुंबईत ४ एप्रिल ते ६ एप्रिल या दोन दिवसांत २२ मद्यपी वाहन चालकांवर विविध पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलम १२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्याचसोबत या मद्यपी वाहन चालकांचे (Drunk Driver) वाहन परवाने रद्द करण्याचाही प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
(हेही वाचा – मंदिरांप्रमाणे चर्च आणि मशिदीही सरकारच्या नियंत्रणाखाली आणा; VHP ची मागणी)
ही आहेत गुन्हे दाखल झालेल्या २२ जणांची नावे
अंकुश रमेश साळुंखे (२८) रा. धोबीघाट, ताडदेव, मुंबई, उमंग सत्येंद्रनाथ ठाकुर, (३५) रा. अंधेरी (पूर्व) मुंबई, जयेश मधुसुदन मंडवाल (२९) रा. अंबरनाथ, जिल्हा – ठाणे, गौरख मालकोटी (३९) रा. सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई, संतोष आत्माराम गावडे (५९)रा. पार्कसाईट, विक्रोळी, मुंबई, अभिषेक दिनानाथ दुबे (३३) भिवंडी, जिल्हा – ठाणे, अनिकेत लक्ष्मण अंब्राळे (३०) रा. भांडुप (पश्चिम) मुंबई, मुकेश कैलाश साव (३२) रा. दहिसर, मुंबई, हेतुल पुरुषोत्तम रामजीयानी (३०) रा. घाटकोपर (पश्चिम) मुंबई, सुहास लक्ष्मण राणे, (५१), कलिष्का विनोद इक्का (४३), सागर विरेंद्र सिंग (२६), धर्मेंद्र महेश सिंग (३५), नंदकिशोर संतराम कोरी (४९), विपुल अक्षय मिश्रा (३६),विपुल शरद चंदनशिवे (२७), सुरेश देवीराम सोनार( ४९), गिरिशचंद्र शिवचंद्र शुक्ला (४४), शब्बीर अब्दुल शकुर शेख (३६), मयुर पंढरीनाथ साखरे (३३), मोह. इरफान वाहजुद्दीन खान (३२), दुखन साब अग्रीत साब (४९) असे गुन्हे दाखल झालेल्या २२ जणांची नावे आहेत. या २२ जणांचे वाहन परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community