अमेरिकन विमानात मद्यधुंद अवस्थेत भारतीय विद्यार्थ्याने केली लघुशंका; सहप्रवाशाने केली तक्रार…

काही दिवसांपूर्वीच एअर इंडियामध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा प्रकार घडल्यानंतर आता अमेरिकेहून दिल्लीला येणाऱ्या विमानात सुद्धा धक्कादायक प्रकार घडला आहे. न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला येणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याने मद्यधुंद अवस्थेत बसलेल्या ठिकाणीच लघुशंका केली. यानंतर हा विद्यार्थी सहप्रवाशाच्या अंगावर पडला.

( हेही वाचा : संविधानाला बाजूला सारुन काँग्रेसने आतंकवाद्याप्रमाणे सरकार चालवले – चंद्रशेखर बावनकुळे)

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार एए२९२ या क्रमांकाच्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाने शुक्रवारी रात्री ९ वाजून १६ मिनिटांनी न्यूयॉर्कहून उड्डाण केले होते. १४ तास २६ मिनिटांच्या प्रवासानंतर हे विमान शनिवारी रात्री १० वाजून १२ मिनिटांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले.

CISF च्या जवानांनी आरोपीला घेतले ताब्यात

आरोपी तरूण हा अमेरिकेतील विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तो मद्यधुंद अवस्थेत झोपला असताना त्याने लघुशंका केला हा प्रकार लक्षात आल्यानंतर आरोपीच्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशाने यासंदर्भात फ्लाइट क्रूकडे तक्रार केली. यावेळी सहप्रवाशाच्या अंगावर हा आरोपी पडला. दरम्यान या घडलेल्या प्रकारानंतर आरोपीने माफी मागितली.

फ्लाइट क्रूने या घटनेची माहिती इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली. हे विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर CISF च्या जवानांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here