मुंबईत दहशतवादी आले असून, त्यांच्या काही तरी मोठा प्लॅन असल्याचा कॉल करून २६/११ च्या दिवशी खळबळ उडवून देणाऱ्या मद्यपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. किशोर लक्ष्मण ननावरे असे अटक करण्यात आलेल्या मद्यपीचे नाव आहे. पूर्व उपनगरातील एकता नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या किशोर ननावरे याने मद्याच्या नशेत हा कॉल केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. (Mumbai Police Bogus Call)
२६/११ च्या हल्ल्याला रविवारी १५ वर्षे पूर्ण होऊन संपूर्ण मुंबईत वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात येत होती. त्याच दरम्यान मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून “मानखुर्द पोलीस चौकी एकता नगर या ठिकाणी दोन ते तीन आतंकवादी आले होते व त्यांची भाषा मला समजत नाही. त्यांचे काहीतरी प्लॅनिंग चाललेले आहे. त्यांच्याकडे बॅग आहे व त्यांनी मला बाथरूमला जाण्याचा रस्ता विचारला.” अशी माहिती दिली. नियंत्रण कक्षाचे पोलीस त्याला पुढे काही विचारणार तो पर्यंत त्याने फोन कट करून मोबाईल फोन स्विच ऑफ केला. (Mumbai Police Bogus Call)
(हेही वाचा – BJP : लोकसभा निवडणुकीआधी भाजपात बंडखोरांची होणार घरवापसी; काय असणार प्लॅन?)
नियंत्रण कक्षाकडून तात्काळ वरिष्ठ अधिकारी यांना माहिती कळविण्यात आल्यानंतर मुंबईत सतर्क जारी करण्यात आला. दरम्यान ही माहिती प्राप्त होताच पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६ यांचे मार्गदर्शनाखाली मानखुर्द, शिवाजीनगर व ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे पथक तयार करून मानखुर्द पोलीस ठाणे हद्दीतील एकतानगर परिसरात संशयित व्यक्तींचा शोध घेण्यात आला. तसेच कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असताना मानखुर्द एकता नगर या ठिकाणी कॉल करणारा किशोर ननावरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता मद्याच्या नशेत त्याने कॉल करून खोटी माहिती दिल्याचे समोर आले. या प्रकरणी त्याच्या विरोधात कलम १८२, ५०५(१)(ब) भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. (Mumbai Police Bogus Call)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community