पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (DS kulkarni) यांच्या जंगली महाराज रोडवरील कार्यालयावर ईडीने (ED) धाड टाकली आहे. आज सकाळपासून छापेमारी सुरु आहे. ईडीची दोन पथकं पुणयात दाखल झाली आहेत. या पथकांकडून कारवाई केली जात आहे. ईडीचे (ED) अधिकारी व केंद्रीय तपास यंत्रणेचे विविध पोलीस या कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत. ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी हे काही दिवस जेलमध्ये देखील होते. विविध पोलीस स्थानकांमध्ये डीएसके यांचा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (DS kulkarni)
ईडी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयाची झडती
डी. एस. कुलकर्णी (DS kulkarni) यांचं जंगली महाराज रोडवरील कार्यालय आज उघडण्यात आलं. न्यायालयाच्या परवानगीने ही कारवाई सुरू आहे. याठिकाणी ईडी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयाची झडती सुरू आहे. २०१७ साली त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. मागील काही महिन्यांपूर्वीच त्यांची सुटका झाली होती. पण ईडीने पुन्हा एकदा आता कुलकर्णी यांच्या घरावर धाड टाकली आहे. (DS kulkarni)
हे पहा –
Join Our WhatsApp Community