Mangaldas Bandal यांच्या घरावर ईडीची छापेमारी; ८५ कोटींची मालमत्ता जप्त

79
Mangaldas Bandal यांच्या घरावर ईडीची छापेमारी; ८५ कोटींची मालमत्ता जप्त
Mangaldas Bandal यांच्या घरावर ईडीची छापेमारी; ८५ कोटींची मालमत्ता जप्त

पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांची ८५ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. बांदल यांची पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली. बेकायदा आर्थिक व्यवहार (मनी लॉड्रिंग) प्रकरणी मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने २१ ऑगस्ट रोजी छापे टाकले होते.

(हेही वाचा-Rajshree Munde : धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीला अपघात; कार अन् ट्रॅव्हल्समध्ये जोरदार धडक)

ईडीकडून बांदल (Mangaldas Bandal)यांच्या निवासस्थानातून कागदपत्रे जप्त केली. बांदल यांच्या बँक खात्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यानंतर बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली. बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती.

बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती. मात्र, बांदल यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन त्यांची उमदेवारी रद्द करण्यात आली होती.(Mangaldas Bandal)

(हेही वाचा-CJI Chandrachud :१० नोव्हेंबरला संपणार सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ; पत्र लिहून केली ‘या’ नावाची शिफारस)

मंगलदास बांदल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभा निवडणुकीवेळी सुनेत्रा पवार यांचा बांदल यांनी प्रचार केला होता. बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.(Mangaldas Bandal)

(हेही वाचा-Baba Siddiqui यांच्या हत्येसाठी वापरले अत्याधुनिक शस्त्र)

मंगलदास बांदल यांच्यासह हनुमंत खेमदारे आणि सतीश यादव यांची यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. अनिल भोसले यांच्याविरोधात दाखल होता गुन्हा त्याच गुन्ह्यात ईडीची कारवाई करण्यात आली आहे. मंगलदास बांदल यांनी कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनिल भोसले यांच्याविरोधात यापूर्वी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.(Mangaldas Bandal)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.