Cryptocurrency : देशभरात ६६०६ कोटींचा बिटकॉईन घोटाळा, नितीन गौरला ईडीने केली अटक

क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी १० टक्क्यांचा परतावा देण्याचे आमिष दाखवणारी योजना मे. व्हेरिएबल टेक. प्रा.लि ने २०१७ मध्ये राबविली होती.

260
Cryptocurrency : देशभरात ६६०६ कोटींचा बिटकॉईन घोटाळा, नितीन गौरला ईडीने केली अटक

तब्बल सहा हजार ६०६ कोटी रुपयांचा बिटकॉईनचा घोटाळा केल्याप्रकरणी आरोपी नितीन गौर (Nitin Gaur)याला ईडीने दिल्लीतून अटक केली. या कारवाईनंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. त्याला न्यालायात हजर केले असता ईडीने ६ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. (Cryptocurrency)

क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी १० टक्क्यांचा परतावा देण्याचे आमिष दाखवणारी योजना मे. व्हेरिएबल टेक. प्रा.लि ने २०१७ मध्ये राबविली होती.गौर याला २९ डिसेंबर रोजी दिल्लीत अटक करण्यात आली आणि ट्रान्झिट रिमांडवर मुंबईला आणण्यात आले. त्यांनंतर ही सुनावणी करण्यात आली.ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नितीन गौर हा अजय भारद्वाजचा मेहुणा आहे, जो महेंद्र भारद्वाजसह या प्रकरणातील मुख्य आरोपी असून फरार आहे. अजय भारद्वाजची पत्नी सिंपीला ईडीने १७ डिसेंबर रोजी अटक केली होती. तर या योजनेचा प्रसार करण्यासाठी कंपनीने देशभरात एजंट नेमले आहेत. (Cryptocurrency)

(हेही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj : शिवकालीन वास्तू, शस्त्र संवर्धनासाठीच्या समितीत शिवरायांच्या सरदारांच्या वारसदारांना स्थान)

ईडीने ६९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, व्हेरिएबल टेकने कंपनीने विकसित केलेल्या क्रिप्टोकरन्सीच्या रूपात उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन भोळ्या गुंतवणूकदारांना आमिष दाखवले. गुंतवणूकदारांना कधीही परतावा परत केला गेला नाही.ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्रवर्तकांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आणि चुकीच्या पद्धतीने मिळवलेले बिटकॉईन ऑनलाइन वॉलेटमध्ये लपवले.ईडीने ६९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून तपास पूर्ण करण्यासाठी काही देशांची मदत मागितली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.