- प्रतिनिधी
टोरेस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ने समांतर तपास सुरू केला आहे. ईडीचे अधिकारी हे शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आले होते. टोरेस घोटाळा संदर्भात या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली असून या गुन्ह्याच्या कागदपत्रांची मागणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. टोरेस घोटाळा प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे, या घोटाळ्यात जवळपास सव्वा लाख गुंतवणूकदारांची एक हजार कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi यांचा पहिला पॉडकास्ट व्हायरल; म्हणाले, माझ्याकडूनही चूका होतात…)
शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला असून आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक गठीत करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास केंद्रित तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सुरू केला आहे. या घोटाळ्याची पाळेमुळे विदेशात असल्यामुळे ईडीकडून या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत आहे.
(हेही वाचा – SIM Card Protection : तुमच्या नावावर असलेलं सिम दुसरंच कुणी वापरत नाही ना कसं तपासाल?)
शुक्रवारी ईडीचे (ED) काही अधिकारी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले होते. या अधिकाऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या गुन्ह्याच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने या घोटाळा प्रकरणात अटक आरोपीच्या निवासस्थानाची तसेच टोरेस कंपनीचे मुंबईत तीन ठिकाणी असलेल्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत पोलिसांनी जवळपास ५ कोटी रुपयांची रोकड आणि काही मुद्देमाल आणि कागदपत्रे जप्त केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community