ED : ईडीने छापे टाकलेल्या कंत्राटदारांची नावे आली समोर

230
ED : ईडीने छापे टाकलेल्या कंत्राटदारांची नावे आली समोर
ED : ईडीने छापे टाकलेल्या कंत्राटदारांची नावे आली समोर

अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) बुधवारी छापेमारी करण्यात आलेल्या सरकारी कंत्राटदारांची नावे समोर आली आहे. रोमीन छेडा, रोमेल ग्रुपचे बिल्डर ज्यूड रोमेल आणि डॉमनिक रोमेल अशी कंत्राटदारांची नावे आहेत. मनपाच्या कोविड जम्बो सेंटर घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित चौकशीचा भाग म्हणून या कंत्राटदारांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडी कडून बुधवारी छापेमारी करण्यात आली होती, त्याच बरोबर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान अशा एकूण १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. छापे टाकण्यात आलेली ठिकाणे ही कोविडच्या  कालावधीत मुंबई महानगरपालिकेला सेवा पुरविणाऱ्या कंत्राटदारांच्या संबंधित होती अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. छापेमारी दरम्यान आरोप असलेल्या कंत्राटदारांकडून सुमारे पावणे दोन रुपयांची रोख रक्कम आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

ज्या कंत्राटदारांवर ईडीने छापे टाकले त्यात घाटकोपर येथील रोमीन छेडा या कंत्राटदाराचा समावेश आहे, ज्यांना ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्याला मनपा कडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचा संशय आहे. छेडा याने यूपी-स्थित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत कंत्राटाचे काम करून घेतल्याचा संशय आहे आणि कोविड-१९ महामारीच्या काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी त्यांना सुमारे ३०० कोटी रुपये दिले गेले होते, असे ईडीच्या सूत्राने सांगितले. निकृष्ट उपकरणे पुरवल्याचा आरोप असूनही, त्याचा तपास सुरू असताना कंत्राट दाराच्या फायलींवर मनपा अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली आणि त्याला भरघोस मोबदला दिला गेला, असेही सूत्राने सांगितले. छेडा हा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी आहे, जी कंपनी अलाहाबाद, यूपी येथे आहे भायखळा प्राणीसंग्रहालय पेंग्विन एन्क्लोजर घोटाळ्यात या संस्थेला दंड ठोठावण्यात आला होता.

(हेही वाचा – Mumbai Police : व्यापाऱ्याची ४२ लाख रुपयांची हरवलेली बॅग अशी शोधली पोलिसांनी)

दुसरा प्रमुख कंत्राटदार राहुल गोम्स याची ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लिमिटेड ही कंपनी आहे, त्याने दहिसर, वरळी, एमएमआरडीए आणि मुलुंड आणि बीकेसी भाग-२ येथील कोविड सेंटर रुग्णालयामध्ये बेड, पंखे, तंबू आणि इतर सुविधा पुरवल्या आहेत. ओक्स मॅनेजमेंटला मनपाने सुमारे ४० कोटी रुपये दिले होते आणि आता त्याची बारकाईने तपासणी केली जात आहे. विलेपार्ले स्थित रोमेल ग्रुपचे डेव्हलपर ज्युड रोमेल आणि डॉमिनिक रोमेल यांच्या मालकीची ठिकाणेही ईडीने मुंबईतील पश्चिम आणि उत्तर उपनगरात शोधली आहे, जंबो सेंटर युनेस्को गोरेगावसह मेक शिफ्ट रुग्णालये उभारण्यासाठी त्यांच्या संस्थेला १३ कोटी रुपये मिळाले होते. ईडीने त्यांच्या घरातून ६० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. रोमेल बंधूंचे आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्याशी संबंध असल्याचा संशय ईडीकडून व्यक्त करण्यात आला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.