माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत (Sandeep Raut) यांची ईडीकडून दोन वेगवेगळ्या प्रकरणात सात तास चौकशी करण्यात आली आहे. पेडणेकर यांची बॉडी बॅग्ज खरेदी घोटाळा आणि राऊत (Sandeep Raut) यांची खिचडी घोटाळा संबंधी प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. मात्र पेडणेकर यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले की, मला बॉडी बॅग्ज प्रकरणात कुठलेही प्रश्न विचारले गेले नसून किश कॉर्पोरेट सर्व्हिस प्रा. लिमिटेड या कंपनीच्या (SRA) घोटाळा प्रकरणात त्यांच्याकडे प्रश्न विचारण्यात आले व काही कागदपत्रे मागविण्यात आली आहे. (Kishori Pednekar)
अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत (Sandeep Raut) यांना खिचडी घोटाळा प्रकरणात तर, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना बॉडी बॅग्ज खरेदी घोटाळा प्रकरणात समन्स बजाविण्यात आले होते. मंगळवारी या दोघांना ईडी कार्यालयात चौकशीकामी हजर राहण्यास समन्समध्ये नमूद करण्यात आले होते. दरम्यान मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता संदीप राऊत (Sandeep Raut) हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले तर १२ वाजता किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या ईडीच्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या होत्या. (Kishori Pednekar)
(हेही वाचा – Hall Ticket For 10th Exam: दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकिट बुधवारपासून ऑनलाईन उपलब्ध होणार)
बॉडी बॅग्ज प्रकरणात कुठलेही प्रश्न विचारले नाहीत – पेडणेकर
किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सात तास चौकशी केली, त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. सायंकाळी साडेसहा वाजता ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडलेल्या पेडणेकरांनी (Kishori Pednekar) माध्यमासमोर येऊन आपली प्रतिक्रिया मांडली, या प्रतिक्रियेत त्यांनी स्पष्ट केले की, बॉडी बॅग्ज प्रकरणात कुठलेही प्रश्न विचारले गेलेले नसून ईडी अधिकाऱ्यांनी किश कॉर्पोरेट सर्व्हिस प्रा. लिमिटेड या कंपनीच्या लोअर परळ येथील (SRA) घोटाळा प्रकरणात त्यांच्याकडे प्रश्न विचारण्यात आले, आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मी दिली, या संदर्भातील काही कागदपत्रे ईडीने मागवली असून त्यांची पूर्तता करण्यात येईल असे पेडणेकरांनी (Kishori Pednekar) म्हटले आहे. दरम्यान संदीप राऊतांची (Sandeep Raut) खिचडी घोटाळा प्रकरणात ७ तास चौकशी करून सोडण्यात आले. (Kishori Pednekar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community