ईडीच्या वतीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी (ED) मनी लाँड्रींगप्रकरणी (money laundering) महाराष्ट्रातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. मुंबई, कर्जत, बारामती आणि पुण्यात ही धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे. ईडीकडून मनी लाँड्रींग (Money Laundering) प्रकरणी पुण्याच्या एम. एस. शिव पार्वती साखर कारखाना (M. S. Shiv Parvati Sugar Factory) आणि इतर कंपन्यांच्या खात्यात पैशांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. एम/एस. हायटेक इंजीनियरिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा.लि. आणि त्यांचे व्यवस्थापक नंदकुमार तासगांवकर, संजय आवटे आणि राजेंद्र इंगवाले यांच्या बँक लोन फसवणूक प्रकरणी हे अभियान राबवण्यात आलं आहे. (ED Raid)
(हेही वाचा – Vidhan Sabha Election : राष्ट्रवादीची ‘चांदा ते बांदा अजितदादा’ यात्रा)
ईडीच्या या छापेमारीत अनेक संशयास्पद कागदपत्र डिजिटल पुरावे आणि 19.50 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयने या प्रकरणात सर्व प्रथम गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने पुढे तपास सुरू केला आहे. या कंपन्यांनी 100 कोटीचं कर्ज घेतलं होतं. मात्र, कर्ज मिळवण्याच्या अटीनुसार प्रकल्पासाठी 71 कोटी रुपये दिले नाहीत, असे ईडीच्या तपासात समोर आले आहे. तसेच, कर्ज स्वरुपात घेतलेली रक्कम इतर कंपन्यांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे. त्यानुसार ईडीकडून पुढील तपास केला जात आहे. (ED Raid)
(हेही वाचा – Rishi Dadhichi : नैमिषारण्य, पुराणकाळापासून प्रसिद्ध असलेले दधिची ऋषींचे मंदिर; नक्की भेट द्या)
दरम्यान, कंपनीच्या व्यवस्थापकाने आणि सहायक कंपन्यांनी, जसं की एम/एस तासगांवकर कंस्ट्रक्शन लिमिटेड; एम/एस तासगांवकर इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांची सहयोगी एम/एस हायटेक इंजीनियरिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा.लि.च्या माध्यमातून कर्जाच्या रक्कमचा मोठा हिस्सा हडप केल्याचा आरोप आहे. या फसवणुकीतून सरकारी तिजोरीचं मोठं नुकसान झालं असून त्यांनी व्यक्तिगत लाभ मिळवला आहे. याप्रकरणी, सीबीआयसह आता ईडीकडून पुढील तपासणी सुरू आहे. (ED Raid)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community