ED Raids RL Jewellers : जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीचा छापा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईश्वरलाल जैन अडचणीत

184
ED Raids RL Jewellers : जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीचा छापा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईश्वरलाल जैन अडचणीत
ED Raids RL Jewellers : जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीचा छापा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईश्वरलाल जैन अडचणीत

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या राजमल लखीचंद (आर.एल.) ज्वेलर्स समूहाच्या विविध शहरातील कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) छापा टाकण्यात आला. यामध्ये जळगाव कार्यालयातून 87 लाख रुपये जप्त करण्यात आले. दागिनेही सील करण्यात आले आहेत. आर. एल. समूहाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या थकीत कर्जाप्रकरणी बँकेने आणि आर. एल. समूहाने परस्परविरोधी दावे केले आहेत. थकीत कर्ज प्रकरण मार्गी लागत नसल्याने स्टेट बँकेने सीबीआयकडे केलेल्या तक्रारीवरून आर.एल. समूहाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावमध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या सुमारे अधिकाऱ्यांच्या पथकाकडून आरएल ग्रुपची तपासणी करण्यात आली. त्यानंतर ईडी पथकाने आर.एल. ज्वेलर्सच्या शोरुममधील 87 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे असून शोरुममधील सोन्याचा स्टॉक सील केला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ईश्वरलाल जैन त्यांचे पुत्र आणि माजी आमदार मनीष जैन, तसेच दोन्ही नातवांचे जबाब नोंदवून घेतले असून अधिक माहिती घेण्यासाठी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स देखील बजावले आहे.

(हेही वाचा – Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेकरूचा 300 फूट खोल दरीत पडून मृत्यू, दुसरा जखमी)

माजी खासदार ईश्वरलाल जैन हे 15 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे खजिनदार राहिले आहेत. जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची जागा ही सुद्धा ईश्वरलाल जैन यांच्याच नावावर आहे. जळगावसह त्यांच्या मुंबई, नाशिकसह विविध ठिकाणच्या सहा कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाने छापेमारी केली.

या कारवाईसंदर्भात रियल समूहाचे संचालक ईश्वरलाल जैन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, स्टेट बँक आणि समूहामध्ये थकीत कर्जावरून हा वाद सुरु आहे. तपासणी करताना रोख रक्कम जप्त करणे आणि सोने सील करण्याची केलेली कारवाई गैर असून त्याविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहोत. पथकाने जेथे कारवाई केली, ती आर.एल. एंटरप्राईज ही फर्म नातवांच्या नावाने आहे, त्यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. 15 आणि 16 ऑगस्ट रोजी बँक बंद होती. त्यामुळे रकमेचा भरणा झालेला नाही. तसेच हिशोबसुद्धा लिहिला गेलेला नाही, असे असतानाही 87 लाख रोकड होती, ती जप्त करणे चुकीचे आहे. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना कागदपत्रे दिलेली असल्याचे प्रतिक्रिया जैन यांनी दिली.

ईश्वरलाल जैन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “ईडीने केलेली ही कारवाई कायद्याला धरून नाही. त्याविरोधात आपण न्यायालयात लढा देणार आहोत. त्यात आपल्याला यश मिळेल, असा विश्वास आहे. सर्वच सोने, रोकड त्यांनी ताब्यात घेतल्याने आपला व्यावसाय आज अडचणीत आला आहे. तो पुन्हा उभा करण्यासाठी आता आपल्याला मित्रपरिवार आणि नातेवाईक यांची मदत घ्यावी लागणार आहे. लवकरच आपण हा व्यवसाय पुन्हा उभा करू, असा विश्वास असला, तरी आज मात्र ईडीची कारवाई आमच्यासाठी त्रासदायक ठरली आहे. ही कारवाई राजकीय हेतूने झाल्याची चर्चा केली जात असली, तरी अजून तरी यामध्ये राजकारण आहे किंवा नाही, हे सांगू शकत नाही.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.