ईडीने (ED) मुंबईसह दिल्लीतील 14 ठिकाणावर छापेमारी केली आहे. कर्ज घोटाळा प्रकरणात (Loan scam case) ED ने धडक कारवाई केली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. ईडीने शुक्रवारी 5 कोटी 40 लाखांची मालमत्ता गोठवली. बँक फसवणूक प्रकरणात मे. प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड (Pratibha Industries Limited) आणि इतरांविरुद्ध ही शोध मोहीम राबवण्यात आली. (ED)
हेही वाचा-Bangladeshi infiltrators : बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी जनआंदोलन आवश्यक
ईडीने (ED) दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) प्रतिभा इंडस्ट्रीज, अजित कुलकर्णी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ईडी प्रकरणात तपास करत आहे. बँक समूहाची 4,957 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणात मुंबई आणि दिल्लीत 14 ठिकाणी ईडीने छापे टाकले. बँक ऑफ बडोदाने सीबीआयकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत बँक ठेवी, म्यच्युअल फंड अशी पाच कोटी 40 लाख रुपयांची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) (ED) मुंबई आणि दिल्लीतील 14 ठिकाणी शुक्रवारी (३ जानेवारी) छापे टाकले.
हेही वाचा- Local Update: मुंबईकरांचं टेन्शन वाढणार; रविवारी ‘तिन्ही’ मार्गावर Mega Block
प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांवर प्रकरणात फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. संचालकांनी कट रचून बँकांचे नुकसान केले. गैरव्यवहाराची रक्कम बनावट व्यवहारांमार्फत इतरत्र वळवली. त्याआधारे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मे. प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड, अजित कुलकर्णी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या मालमत्तांच्या खरेदीबाबत कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करत आहे. (ED)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community