महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Vidhansabha Election 2024) भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मालेगाव येथील बँकेत बेहिशोबी पैसा हवालामार्फत जमा झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी 125 कोटी रुपये विविध बँक खात्यात जमा झाल्याचे आणि तो पैसा विविध खात्यात हस्तांतरीत केल्याचा आणि रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभुमीवर आता ईडीने (ED Raid) महाराष्ट्रात (Maharashtra) आणि गुजरात (Gujarat) अशा २३ ठिकाणी छापेमारी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी येत्या २ दिवसांत धमाका होणार, असा इशारा दिला होता. त्यानंतर आता ईडीकडून (ED Raid) छापेमारी सुरू आहे. व्होट जिहाद प्रकरणाशी संबंधित ही छापेमारी असू शकते. या प्रकरणातील मास्टरमाईंड सिराज अहमद (Siraj Ahmed) याला आणि नाशिक मर्चेंट कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक निकम यांना अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा-Maharashtra Vidhansabha Election 2024: ‘Vote Jihad’ प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; दोघांच्या आवळल्या मुसक्या)
125 कोटींच्या घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी ED (ED Raid) ची टीम मालेगावात दाखल झाली आहे. प्रमुख आरोपी असलेल्या सिराज अहमदच्या घरी ED कडून तपासणी सुरू आहे. नामको बँकेची देखील ED चौकशी (ED Raid) करण्याची शक्यता आहे. त्यानंतर छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात चर्चा करणार. व्होट जिहादसाठी हा पैसा वापरला गेल्याचे किरीट सोमय्या यांनी वक्तव्य केलं होतं. काल किरीट सोमय्या यांनी येत्या दोन दिवसांत धमाका होणार असे वक्तव्य केले होते. (ED Raid)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community