ED raids; मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई; १३० कोटींची मालमत्ता जप्त

219
मोबाइल अॅपच्या माध्यमातून बेटिंगचा (Mahadev Betting App) अवैध उद्योग करत पाच हजार कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून परदेशात नेणाऱ्या महादेव अॅप कंपनीला शनिवारी ईडीने पुन्हा दणका देत १३० कोटी ५७ लाखांची मालमत्ता जप्त केली. त्यात कंपनीने गुंतवणूक केलेले रोखे, बॉण्ड, डिमॅट खात्यातील रक्कम आदींचा समावेश आहे. ७ डिसेंबरलाही ईडीने ३८८ कोटी ९९ लाखांची मालमत्ता जप्त केली होती. (ED raids)

(हेही वाचा – Maharashtra Cabinet : मंत्रीमंडळ विस्ताराची नागपुरात तयारी; कोणाची लागणार मंत्रीपदी वर्णी

एकूण १२ आरोपींना अटक
या प्रकरणी गोविंद केडियासह (Govind Kedia) एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर १०० हून अधिक ठिकाणी झडती घेण्यात आली असून चार फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. एकूण ५३० कोटी रुपयांच्या मालमत्तेसाठी तीन तात्पुरते संलग्नक आदेश जारी करण्यात आले आहेत.
आतापर्यंत १९.३६ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. १६.६८ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या असून १७२९.१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील ED जंगम आणि स्थावर मालमत्तेची आजच्या तारखेनुसार एकूण किंमत 2295 कोटी रुपये (अंदाजे) आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

(हेही वाचा – one nation one election घटनादुरुस्तीत काय असतील तरतुदी ?)

गोविंद केडिया 20 डिसेंबरपर्यंत तुरुंगात
महादेव सत्ता ॲप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात असलेला शेअर ब्रोकर गोविंद केडिया यालाही गुरुवारी रायपूरच्या विशेष न्यायालयात (Special Court of Raipur) हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने केडियाला २० डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गोविंद केडिया यांची कोठडीदरम्यान ईडीने चौकशी केली. मात्र ईडीच्या (ED Red in Mahadev betting app) टीमला गोविंद केडिया यांचे विशेष सहकार्य मिळाले नाही. सध्या केडियाला सर्व आरोपींसह न्यायालयीन कोठडीवर कारागृहात पाठवण्यात आले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.