उत्तराखंडमधील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हरकसिंग रावत यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज, बुधवारी मोठी कारवाई केली आहे. रावत यांच्या संबंधित ठिकाणांवर उत्तराखंडपासून दिल्ली आणि चंदीगडपर्यंत छापे टाकण्यात आले आहेत.
उत्तराखंडमधील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हरकसिंग रावत यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (Ed) बुधवारी मोठी कारवाई केली. उत्तराखंडपासून दिल्ली आणि चंदीगडपर्यंत छापे टाकण्यात आले आहेत. देशातील ३ राज्यांमधील १५ हून अधिक ठिकाणी ईडीची शोध मोहीम सुरू आहे. ईडीची ही कारवाई २ वेगवेगळ्या प्रकरणात करण्यात आली आहे. एक प्रकरण वनजमिनीशी संबंधित आहे तर दुसरे प्रकरण अन्य एका जमीन घोटाळ्याशी संबंधित आहे.
(हेही वाचा – Harassment In Mumbai : मालकाच्या छळाला कंटाळून बोटीसह तिघांचे भारतात पलायन)
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दक्षता विभागाने काँग्रेस नेते हरक सिंह रावत यांच्यावर कारवाई केली होती. ईडीची टीम बुधवारी सकाळी डेहराडूनच्या डिफेन्स कॉलनीमध्ये रावत यांच्या घरी पोहोचली. पाखरो रेंज घोटाळ्याशी संबंधित तपासासाठी ईडीचे पथकाने हा छापा टाकल्याची माहिती पुढे आलीय.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community