मनी लाँड्रिंग प्रकरणी Fair Play वेबसाईटच्या कार्यालयावर ईडीचे छापे 

35

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या ऑनलाईन बेटिंगमध्ये गुंतलेल्या फेअरप्ले (Fair Play) वेबसाईटवर छापेमारी करून 117 कोटींची मालमत्ता गोठवल्याची माहिती अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) दिली.

यासंदर्भातील एका निवेदनात ईडीने सांगितले, की, मुंबई आणि कच्छमध्ये 25 ऑक्टोबर रोजी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये तपास यंत्रणेने 4 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेशी संबंधित डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत तांत्रिक आणि आर्थिक व्यवस्थापनात ‘फेअरप्ले’ला  (Fair Play) मदत करणाऱ्या लोकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. हे मनी लाँड्रिंग प्रकरण मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित आहे. तसेच 100 कोटींहून अधिक महसूल गमावल्याबद्दल ‘वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’ ने ‘फेअरप्ले स्पोर्ट्स एलएलसी’ विरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

(हेही वाचा Assembly Election 2024 : उबाठा शिवसेना, काँग्रेसमध्ये घोळात घोळ; जाहीर केलेले उमेदवार बदलण्याची नामुष्की)

फेअरप्लेच्या मागे असलेली व्यक्ती प्रामुख्याने क्रिश लक्ष्मीचंद शाह नावाची व्यक्ती आहे आणि त्याने वेबसाइट ऑपरेट करण्यासाठी कुराकाओ (दक्षिण कॅरिबियन समुद्रातील एक बेट देश) आणि डच अँटिल्स मॅनेजमेंट एनव्ही, दुबई येथे प्ले व्हेंचर्स एनव्ही विकत घेतले आहे. फेअर प्ले  (Fair Play) स्पोर्ट्स एलएलसी, फेअरप्ले मॅनेजमेंट डीएमसीसी आणि प्ले व्हेंचर्स होल्डिंग लिमिटेड यासारख्या विविध कंपन्या माल्टामध्ये नोंदणीकृत असल्याचे ईडीने सांगितले.चौकशीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून हे उघड झाले आहे की, या गुंतलेल्या लोकांनी भारतात महागड्या चल-अचल मालमत्ता खरेदी केल्या आहेत आणि त्यांची किंमत १०० कोटींहून अधिक असल्याचे ईडीने स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.