पंकज मेहादिया आणि इतरांच्या गुंतवणुकीच्या घोटाळ्याशी संबंधित पीएमएलए २००२ च्या अंतर्गत नागपूर आणि मुंबई येथे १५ ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. पंकज मेहादिया, लोकेश जैन, कार्तिक जैन यांच्या निवासस्थान व कार्यालयांमध्ये ही छापेमारी करण्यात आली. जे या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी होते.
ईडीने पंकज नंदलाल मेहादिया, लोकेश संतोष जैन, कार्तिक संतोष जैन, बाल्मुकुंड लालचंद कील, प्रेमलता नांडलाल मेहादिया याच्याविरोधी ईडीने सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीच्या तपासणीत असे दिसून आले की, इतर साथीदारांसह पंकज नंदलाल मेहादिया हे एक योजना राबवत, त्याअंतर्गत टीडीएस वजा करून १२ टक्के नफा देण्याचे आश्वासन देऊन विविध गुंतवणूकदारांना आकर्षित केले होते. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना संबंधित कंपन्या/कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आणि शेवटी परत पैसे बुडवले. तब्बल १५० कोटींचा हा घोटाळा होता. ईडीने ५.२१ कोटींचे सोने आणि डायमंड जप्त केले तर १.२१ कोटींची रक्कम जप्त केली.
(हेही वाचा चंदेरी गडावर शिवरायांच्या ८५ किलो मूर्तीची केली स्थापना; शिवप्रेमींच्या भगीरथ प्रयत्नांना यश)