Mumbai ED Raid : दादर येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र शो रूम वर ईडीची छापेमारी

विकासककाची ११३.२५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी करण्यात आली छापेमारी

1081
Mumbai ED Raid : दादर येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र शो रूम वर ईडीची छापेमारी
Mumbai ED Raid : दादर येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र शो रूम वर ईडीची छापेमारी

दादर येथील साड्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या भरतक्षेत्र या शोरूमवर बुधवारी ईडीच्या (ED Raid) अधिकाऱ्यांकडून छापेमारी करण्यात आली. २०१९ मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल असलेल्या ११३.२५ कोटींच्या फसवणूकी प्रकरणी ईडीकडून ही छापेमारी (ED Raid) करण्यात आली असल्याची माहिती ईडीच्या (ED Raid) सूत्रांनी दिली आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत सन २०१९ मध्ये भरतक्षेत्र शोरूमचे मालक मनसुख गाला, सीए दिनेश शाह आणि इतर आरोपीविरुद्ध फसवणूक, बनावट दस्तावेज प्रकरणी गुन्हा दाखल आहे. एसबी डेव्हलपर्स कंपनीचे विकासक अरविंद शाह यांच्या तक्रारी वरून मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार अरविंद शाह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अरविंद शाह यांनी २००६ मध्ये परळ मधील तीन जुन्या इमारती विकसित करण्यासाठी एसबी डेव्हलपर्स नावाची बांधकाम कंपनी स्थापन केली होती. (Mumbai ED Raid)

या इमारतीत अब्दुल्ला बिल्डिंग १, २ आणि ३ पूर्वी ट्रस्टच्या मालकीच्या होत्या ज्यांचे ट्रस्टी मोहम्मद सलीम माचेसवाला यांनी २० ऑक्टोबर २००५ मध्ये शाह यांना या तीन इमारतींच्या मालकी हक्कांचे पॉवर ऑफ अॅटर्नी काही मोबदल्याच्या बदल्यात शाह यांना दिले होते. अब्दुल्ला बिल्डिंग-१ च्या तिसऱ्या मजल्यावर बंद पडलेल्या तमिळ भाषेच्या मनपा शाळेच्या काही खोल्या असल्याने, शाळेचे भाडे मंजूर करून घेण्यासाठी शहा यांना महापालिकेला ६७ लाख रुपये द्यावे लागले. त्यावेळी त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे शहा यांनी भरतक्षेत्र शो रूमचे मालक मनसुख गाला (Mansukh Gala) यांची मदत घेतली होती. गाला यांनी मदत करण्यासाठी शाह यांना काही अटी व शर्ती घातल्या होत्या. त्यात त्यांनी एसबी डेव्हलपर्स बांधकाम कंपनीमध्ये ५० टक्के भागीदारी ही शर्त घातली होती, शहा यांनी शर्त मंजूर केली होती. (Mumbai ED Raid)

तक्रारीनुसार गाला यांनी सीए (Chartered Accountant) दिनेश शाह यांच्या सोबत कट रचला आणि कंपनीतील शाह यांच्या कुटुंबाच्या शेअर्सशी संबंधित अनेक बनावट आणि बोगस संमतीपत्रे आणि कागदपत्रे तयार केली. नंतर ही खोटी कागदपत्रे रेकॉर्डवर आणण्यासाठी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज कार्यालयाकडे पाठवण्यात आली. गाला आणि दिनेश यांनी शहा यांची डिजिटल स्वाक्षरी बनवून आयकर विभागाकडे बनावट कागदपत्रे सादर केली आणि एसबी अॅबॉड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील शाह आणि त्यांच्या कुटुंबाचा २५ टक्के हिस्सा (५० टक्के इक्विटी शेअरमधून) कमी करण्यात आला. गाला यांनी स्वतःकडे ७५ टक्के हिस्सा ठेवून शहा यांना २५ टक्के भागीदार असल्याचे खोटे दस्तावेज बनविण्यात आले. (Mumbai ED Raid)

(हेही वाचा – J&K Reservation (Amendment) Bill 2023 : काश्मिरी विस्थापितांसाठी २ महत्त्वपूर्ण विधेयके लोकसभेत मंजूर; काय होतील लाभ ?)

विकासक कंपनीकडे अब्दुल्ला बिल्डिंग १, २ आणि ३, रहीम मॅन्शन आणि परळमधील सुंदर सदन आहे. कंपनीकडे चेंबूरमधील ग्रीन एकर आणि परळमधील भाग्यम इमारतीचेही विकास हक्क आहेत. कंपनीकडे एकूण १८५ कोटी रुपयांची मालमत्ता असून विकास कामानंतर कंपनीला ४५३ कोटी रुपयांचा नफा मिळणार होता. शाह यांनी आर्थिक गुन्हे शाखेला दिलेल्या तक्रारीत दावा केला आहे की त्यांच्या कुटुंबाचा हिस्सा २५ टक्क्यांपर्यंत कमी करून गाला यांनी त्यांचे व कुटुंबाचे ११३.२५ कोटी रुपयांचे नुकसान केले आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. २०१९ मध्ये दाखल असलेल्या या गुन्ह्यात ईडी (ED) कडून मनी लाँडरिंग (Money laundering) संबंधी तपास केला जात असून बुधवारी ईडीकडून दादर येथील भरतक्षेत्र शोरूम आणि गाला यांच्या संबंधी असलेल्या कार्यालयावर छापेमारी करून महत्वाची कागदपत्रे तपासकामी ताब्यात घेतली असल्याची माहिती ईडीच्या (ED) सूत्रांनी दिली आहे. (Mumbai ED Raid)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.