अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी नागपुरात छापे टाकल्याचे समोर आले आहे. नागपुरातील रामदास पेठ परिसरातील आर संदेश ग्रुपवर ईडीने छापे टाकले आहेत.
यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आर. संदेश ग्रुपचे रामदेव अग्रवाल यांच्या नागपुरातील कार्यालयात आणि रामदास पेठ परिसरातील निवासस्थानी ईडीचे पथक पोहचले आहे. रामदेव अग्रवाल हे बांधकाम आणि औषध क्षेत्रातील मोठे नाव आहे. बांधकाम क्षेत्रात असल्यामुळे अनेक जमिनीच्या व्यवहारात देखील अग्रवाल सहभागी आहेत. जमिनीशी संबंधित व्यवहाराबाबतच ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात आहे.
अग्रवाल यांच्या रामदासपेठेतील कॅनल रोडवर असलेल्या गौरी हाईट्स या निवासस्थानी सकाळी ईडीचे पथक पोहचले. दरम्यान यासंदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी कसलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
(हेही वाचा – सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! MPSC अंतर्गत भरती, असा करा अर्ज)