Elvish Yadav : एल्विश यादव आणि फाजिलपुरियावर ईडीची मोठी कारवाई! यूपी-हरियाणाची मालमत्ता जप्त

149
Elvish Yadav : एल्विश यादव आणि फाजिलपुरियावर ईडीची मोठी कारवाई! यूपी-हरियाणाची मालमत्ता जप्त
Elvish Yadav : एल्विश यादव आणि फाजिलपुरियावर ईडीची मोठी कारवाई! यूपी-हरियाणाची मालमत्ता जप्तElvish Yadav : एल्विश यादव आणि फाजिलपुरियावर ईडीची मोठी कारवाई! यूपी-हरियाणाची मालमत्ता जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) वादग्रस्त YouTuber आणि बिग बॉस OTT 2 चे विजेते एल्विश यादव (Elvish Yadav) आणि पंजाबी गायक राहुल यादव (Rahul Yadav) उर्फ ​​फाजिलपुरिया यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी ईडीने या दोघांचीही बराच वेळ चौकशी केली आणि त्यांचे जबाबही नोंदवले. एल्विश यादववर (Elvish Yadav) बेकायदेशीरपणे सापांची डिलिव्हरी केल्याचा गंभीर आरोप आहे.

(हेही वाचा-Maharashtra Rain: जिल्ह्यात परतीचा तडाखा! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट)

नोएडा पोलिसांनी एल्विश यादवला 17 मार्च रोजी सापाचे विष खरेदी-विक्रीच्या आरोपाखाली अटक केली तेव्हा ही बाब उघडकीस आली. तपासादरम्यान मनी लाँड्रिंगशी संबंधित माहिती समोर आली, त्यानंतर ईडीने या प्रकरणात हस्तक्षेप करत कारवाई सुरू केली. एल्विशने आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये नशेसाठी सापाच्या विषाचा वापर केल्याचा पोलिसांचा दावा आहे. या आरोपांच्या आधारे पोलिसांनी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. (Elvish Yadav)

(हेही वाचा-e-KYC न केलेल्यांचे रेशनधान्य ‘या’ तारखेपासून बंद होणार)

मात्र, एल्विश यादव यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून ते खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीच्या तपासात नोएडा पोलिसांनी गैरसमजातून काही आरोप लावल्याचे मान्य करत एनडीपीएस कायद्यांतर्गत आरोप वगळले होते. असे असतानाही साप तस्करी, अंमली पदार्थांचा वापर असे गंभीर आरोप अजूनही कायम आहेत. (Elvish Yadav)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.