मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून ईडीने घापेमारी करण्यास सुरुवात केली आहे. राजकीय नेते आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरी ही छापेमारी करण्यात आली. ही सर्व छापेमारी कोरोना काळात झालेल्या कोविड सेंटरच्या घोटाळ्याशी संबंधित आहे.
अशातच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना ईडीने समन्स बजावले असून आज म्हणजेच शुक्रवार ३० जून रोजी चौकशीसाठी बोलावलं आहे. काही दिवसांपूर्वी ईडीकडून मुंबई पालिकेतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी संजील जैस्वाल यांच्याही घरी छापेमारी करण्यात आली होती.
(हेही वाचा – मुंबईसह पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस; कांदिवलीत घरावर स्लॅब कोसळून तरूणाचा मृत्यू)
या छापेमारीत संजीव जयस्वाल यांच्याकडून ईडीला १०० कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली. तसेच १५ कोटींच्या एफडी आणि १३ लाखांची रोख रक्कमही सापडली. तसेच जयस्वाल यांच्या पत्नीकडे देखील ३४ कोटींची संपत्ती आढळून आली.
या छापेमारीनंतर ईडीने जयस्वाल यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र जयस्वाल ईडीच्या कार्यालयात हजर झाले नाहीत. तेव्हा त्यांनी ईडीकडे चार दिवसांचा वेळ मागितला होता. त्यामुळे आता ईडीनं पुन्हा एकदा चौकशीसाठीचं समन्स बजावलं असून ईडीकडून त्यांची आज चौकशी केली जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community