विधानसभा निवडणुकीच्या आदल्यादिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी आर्थिक व्यवहार करण्यासाठी बिटकॉइनचा (Bitcoin scam) वापर केल्याचा आरोप झाला. त्यावेळी सुप्रिया सुळे आणि गौरव मेहता यांच्याशी कॉल रेकॉर्डिंग उघड झाले. त्यानंतर ED ने तातडीने गौरव मेहता याच्या रायपुरमधील घरी धाड टाकली आहे. २०१८ साली झालेल्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी धाड टाकल्याचे सांगण्यात आले.
माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील यांनी २०१८ च्या क्रिप्टोकरन्सी (Bitcoin scam) घोटाळ्यात गौरव मेहता हा प्रमुख आरोपी असल्याचे म्हटले होते. गौरव मेहता हा एका ऑडिट फर्मचा कन्सलटन्ट असून पुणे पोलीस ६,६०० कोटींच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशी करणार आहे. रविंद्र पाटील यांनी दावा केला की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गौरव मेहताला फोन करून क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील (Bitcoin scam) रक्कम निवडणुकीच्या कामासाठी मागितली होती. रविंद्र पाटील यांनी आरोप केला की, सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी २०१८ च्या बिटकॉइन घोटाळ्याचा गैरवापर केला असून या घोटाळ्यातील पैशांचा वापर महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी केला.
सुप्रिया सुळेंनी आरोप फेटाळले
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी बुधवारी सकाळी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना या आरोपांवर उत्तर दिले आहे. एकतर काल संध्याकाळी मला माध्यमांमधून कळले की, असे आरोप झाले आहेत. माझ्या हातात ते व्हॉइस रेकॉर्डिंग आल्यानंतर मी पहिली गोष्ट केली ती म्हणजे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अर्थात अमितेश कुमार यांना फोन केला. मी त्यांना सांगितले की काही बनावट रेकॉर्डिंग फिरत आहेत आणि मला सायबर क्राईमकडे तक्रार करायची आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही तक्रार करा. मी काल संध्याकाळीच ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे की या सगळ्या रेकॉर्डिंग्ज आणि मेसेजेस खोटे आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Bitcoin scam)
Join Our WhatsApp Community