Mankhurd मध्ये साडे आठ टन चांदीच्या विटा जप्त

40

चेन्नई येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरमधून साडे आठ टन चांदी जप्त करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे वाशी चेकनाका येथे नाकाबंदी दरम्यान मानखुर्द (Mankhurd)  पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मागील आठवड्यात विक्रोळी येथे साडेसहा टन चांदीच्या विटा जप्त करण्यात आलेल्या होत्या. मानखुर्द येथे पकडण्यात आलेल्या चांदी प्रकरणी आयकर विभागाला कळविण्यात आले असून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ ६) नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.

वाशी चेक नाका येथे शनिवारी पहाटे मानखुर्द (Mankhurd) पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना एक कंटेनर संशयास्पदरित्या मुंबईच्या दिशेने जात असताना पोलिसांनी कंटेनर अडवून निवडणूक आयोगाने पथक आणि पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता त्यात चांदीचे बार आढळून आले, कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा कंटेनर चेन्नई येथून घेऊन मुंबईतील भायखळा येथे पोहचविण्यासाठी निघालो होतो अशी माहिती चालकाने दिली.

(हेही वाचा Muslim : विधानसभा निवडणुकीत मुसलमान उमेदवार ४२०…)

पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेऊन कंटेनर तपासला असता त्यात साडे आठ टन चांदी असल्याचे आढळून आले, ताब्यात घेण्यात आलेली चांदीची किंमत जवळपास ८० कोटी रुपये असल्याची माहिती पोलीस उपायुक्त ढवळे यांनी दिली आहे. याप्रकरणी आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाला कळवण्यात आले असून ताब्यात घेण्यात आलेली चांदी कायदेशीर आहे की बेकायदेशीर याचा तपास सुरू आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी विक्रोळी पोलिसांनी साडे सहा टन चांदीच्या विटा जप्त केल्या होत्या, तपास करून त्या सोडून देण्यात आलेल्या असून विक्रोळी येथे पकडलेली चांदीच्या विटा बँकेच्या अधिकृत असल्याचे तपासात समोर आले होते. (Mankhurd)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.