भारतात Drug Smuggling साठी एलन मस्क यांच्या स्टारलिंकच्या उपकरणांचा वापर; पोलीस करणार सखोल तपास

51
भारतात Drug Smuggling साठी एलन मस्क यांच्या स्टारलिंकच्या उपकरणांचा वापर; पोलीस करणार सखोल तपास
भारतात Drug Smuggling साठी एलन मस्क यांच्या स्टारलिंकच्या उपकरणांचा वापर; पोलीस करणार सखोल तपास

भारताच्या जलक्षेत्रात आतापर्यंतचा सर्वांत मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात अंदमान निकोबार (Andaman Nicobar) पोलिसांनी ३६० अब्ज रुपयांचे ड्रग पकडले होते. हे ड्रग्ज घेऊन म्यानमारचे सहा तस्कर भारतात येत होते. अंदमानच्या पोलिसांनी या ड्रग्जच्या वाहतुकीचा तपास केला असता त्यामागे स्टारलिंकचा मोठा हात असल्याचे समोर आले आहे. तस्करांनी स्टारलिंकचा वापर करून भारतात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे, वरिष्ठ पोलीस अधिकारी हरगोबिंदर एस. धालीवाल यांनी म्हटले आहे. (Drug Smuggling)

(हेही वाचा – Mumbai Fire Brigade मधील शौर्य पुरस्कार विजेत्यांना तब्बल ३६ वर्षांनी मिळणार खुशखबर; महापालिका घेणार ‘हा’ निर्णय)

भारतीय जहाजावर इंटरनेट उपलब्ध करून देतांना सर्व कायदे धाब्यावर बसविण्यात आले. थेट सॅटेलाईटला जोडून फोन वापरण्यात आले. यामुळे वायफाय हॉटस्पॉट तयार झाला आणि त्याचा वापर भारतीय हद्दीत घुसण्यासाठी करण्यात आला. कंपनीच्या वेबसाईटनुसार हे एक कॉम्पॅक्ट, पोर्टेबल किट आहे जे एका छोट्या बॅगेत आरामात बसू शकते, असे धालीवाल म्हणाले.

तस्करांना इंटरनेट कसे मिळाले ?

एलन मस्क (Elon Musk) यांची कंपनी स्टारलिंकच्या उपकरणाच्या मदतीने तस्करांनी भारतीय जलक्षेत्रात प्रवेश केला होता. जिथे कशाचीच रेंज येत नाही, तिथे स्टारलिंकने (Starlink) रेंज देत इंटरनेट उपलब्ध करून दिले होते. यामुळे त्या जहाजावर वायफाय क्षेत्र तयार झाले आणि तस्करांचे मोबाईल जगाशी जोडले गेल्याचे समोर आले आहे. आता या ड्रग तस्करांची माहिती काढण्यासाठी पोलीस स्टारलिंककडे हे उपकरण कोणी विकत घेतले, कुठे घेतले, कोणी कोणी वापरले याची माहिती मागणार आहे. स्टारलिंक ही कंपनी त्यांचे इंटरनेट हजारो सॅटेलाईटद्वारे पुरविते. ही कंपनी आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात देखील इंटरनेट पुरवित असल्याचा दावा करते. परंतू, देशांच्या जलक्षेत्रात कव्हरेज देण्यासाठी त्या देशांची परवानगी हवी असल्याचे सांगते. (Drug Smuggling)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.