Email Hack : ‘त्या’ एका ईमेल मुळे त्याची परदेशात शिक्षणाची इच्छा राहिली अपूर्ण

39
Email Hack : 'त्या' एका ईमेल मुळे त्याची परदेशात शिक्षणाची इच्छा राहिली अपूर्ण
  • प्रतिनिधी 

हॅकरच्या एका ईमेलमुळे मुंबईतील १८ वर्षीय विद्यार्थ्याचे परदेशातून एमबीबीएस करण्याचे स्वप्न भंग झाले आहे. हॅकरने विद्यार्थ्याचा ईमेल आयडी (Email Hack) हॅक करून त्या ईमेल वरून पोलंडच्या महावाणिज्य दूतावासाला अश्लील आणि आक्षेपार्ह ईमेल केल्यामुळे या विद्यार्थ्यांला व्हिसा नाकारण्यात आला आहे. या प्रकरणी या विद्यार्थ्यांने पार्कसाईड पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात हॅकरविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात अज्ञात हॅकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Hadapsar Assembly Constituency : शरद पवार-उद्धव ठाकरे गटात द्वंद्व)

घाटकोपर पश्चिम येथे राहणारा हिरेन भुंजे (१८) हा विद्यार्थी घाटाकोपरच्या विद्यानिकेतन महाविद्यालयातून १२ वी सायन्स पास झाला आहे. एमबीबीएसचे पुढील शिक्षण त्याने पोलंडच्या ‘पॉझ्नान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्ससेस’ या विद्यापीठातून पूर्ण करण्याचे ठरवले होते, त्यासाठी त्याने ‘करिअर अँड ऑप्शन’ या संस्थे मार्फत प्रवेश घेतला होता. पोलंड येथे शिक्षणासाठी हिरेन याने पोलंड महावाणिज्य दूतावास या ठिकाणी व्हिसासाठी अर्ज केला होता. (Email Hack)

(हेही वाचा – Pune International Airport : पुण्याहून दुबई, बँकॉकसाठी ‘या’ तारखेपासून विमानसेवा होणार सुरू)

दरम्यान, अज्ञात हॅकरने हिरेन भुंजे याचा ईमेल आयडी (Email Hack) हॅक करून त्यावरून पोलंड महावाणिज्य दूतावासाला आणि विद्यापीठाला अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर लिहून मेल पाठवला होता. या चुकीच्या मेलमुळे पोलंड दूतावासाने हिरेन भुंजे याचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचा मेल हिरेनच्या मेल वर पाठविण्यात आला. मी शिक्षणासाठी परदेशात जाऊ नये म्हणून कोणीतरी मुद्दाम हा खोडसाळपणा केला असावा असा संशय हिरेन भुंजे याने व्यक्त केला आहे. याप्रकरणी हिरेन याने पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात हॅकर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.