मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकीचा ईमेल (Email Threat) मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) ला गुरुवारी आला आहे. या मेल मध्ये धमकी देणाऱ्याने “बिटकॉइनच्या रूपात एक दशलक्ष डॉलर्स ची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास पुढील ४८ तासांत टर्मिनल २ वर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात येईल अशी धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या ईमेल नंतर विमानतळाची सुरक्षा वाढविण्यात आली असून संपूर्ण विमानतळावर तपासणी सुरू आहे. या प्रकरणी सहार पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे गुणवत्ता आणि ग्राहक सेवा विभागाचे अधिकारी असलेले दृश्यम पाठक (३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुंबई विमानतळ प्राधिकरण कंपनीने ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी [email protected] हा ईमेल आयडी तयार केला आहे. अनेक प्रवासी त्यांच्या फ्लाइट संदर्भातील माहिती ईमेलद्वारे घेत असतात. अनेक जण या इमेल आयडीवर आपल्या तक्रारीही पाठवतात. हा ईमेल आयडी (Email Threat) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कर्मचारी हाताळत असतात. हा ईमेल आयडी प्रवाशांसाठी वेबसाइट आणि सोशल मीडियावरही उपलब्ध आहे.
(हेही वाचा-Flax Seeds : केस सिल्की होण्यासाठी ‘हा’ पदार्थ आहे वरदान )
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ नोव्हेंबर रोजी तक्रारदार पाठक यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी ८ वाजता टर्मिनल २ येथे उपस्थित होते आणि मेल (Email Threat) तपासत असताना त्यांना एका मेलमध्ये त्याला या विषयावर ‘स्फोट’ लिहिलेले आढळले. त्यांनी मेल तपासला असता त्या मेलमध्ये लिहिले होते की, “तुमच्या विमानतळावर ही शेवटची सकाळ आहे. टर्मिनल २ वर ४८ तासांच्या आत मोठा स्फोट होईल. दिलेल्या पत्त्यावर बिटकॉइनच्या रूपात एक दशलक्ष डॉलर्स द्या.” धमकीचा मेल पाठवणाऱ्या आरोपींनी पत्ताही दिला होता.
तक्रारदार पाठक यांनी विमानतळावरील सुरक्षा विभाग, टर्मिनल ऑपरेशन विभाग आणि विमानतळावरील सर्व सुरक्षा विभागांना या धमकीच्या मेलची माहिती दिली. तक्रार मिळाल्यानंतर सहार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
Join Our WhatsApp Community