बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील माने याने अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांडात माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली आहे. दरम्यान मानेकडे कायद्याची पदवी असल्यामुळे स्वतः खटला चालविण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे.
बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील माने याला अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हत्याकांड प्रकरणात एनआयए अटक केली असून माने सध्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. सुनील माने याने १७ फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता, या अर्जात त्याने ‘माफीचा साक्षीदार’ होण्यासाठी आणि गुन्ह्याबद्दल जे काही माहित होते ते उघड करण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. “माझ्या कारावासात खोलवर विचार केल्यावर मला माझ्या चुका कळल्या. एक पोलीस अधिकारी असल्याने देशातील नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य होते. पण दुर्दैवाने आणि नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या आहेत,” असे याचिकेत म्हटले आहे.
(हेही वाचा – २००४ साली मुंबईत दंगली भडकवण्याचे उद्धव ठाकरेंनी दिले होते आदेश; नितेश राणेंचा गंभीर आरोप)
या चुकांचा पश्चात्ताप करण्यासाठी आणि पीडितेला (हिरेन) आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मी या प्रकरणातील संपूर्ण परिस्थिती आणि वस्तुस्थिती पूर्ण आणि सत्य उघड करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याने न्यायालयाला त्याची दखल घेण्याची विनंती केली होती. माझी पोलीस खात्यातील सेवा, रेकॉर्ड विचारात घ्या आणि मला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत माफी देऊन त्याच्या चुकांचा पश्चात्ताप करण्याची संधी” द्या. असे याचिकेत म्हटले होते. मात्र मंगळवारी माने याने न्यायालयात केलेली ही याचिका मागे घेतली आहे. याचिका मागे घेण्यामागे माने याच्यावर कोणाचा दबाव होत आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान मानेकडे कायद्याची पदवी असल्यामुळे स्वतः खटला चालविण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community