Onion : कांदा निर्यातीवर बंदी म्हणून टोमॅटोच्या कंटेनरमधून कांद्याची निर्यात; सीमा शुल्क विभागाची कारवाई

केंद्र सरकारने कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांनानिराश करणारा निर्णय 8 डिसेंबरला घेतला. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

287

सध्या देशात कांदा निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) लावण्यात आली आहे. मात्र, टोमॅटोच्या कंटेनरमधून कांद्याची (Onion) परदेशात निर्यात करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तब्बल  82.93 मॅट्रिक टन कांदा टोमॅटोच्या कंटेनरमधून लपवून परदेशात पाठवण्यात येत होता. हा कांदा यूएईला पाठवण्यात येत असल्याची गोपनीय माहिती सीमा शुल्क विभागाच्या नागपूर युनिटला मिळाली होती. त्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली.

नाशिकच्या दोन निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये टोमॅटो पेट्यांमागे कांदा (Onion) पॅक करुन UAE ला पाठवण्याची तयारी केली होती. मात्र, सीमा शुल्क विभागाच्या नागपूरच्या टीमने मुंबईला जाऊन कंटेनरची तपासणी केली. तेव्हा कंटेनरच्या समोरच्या भागांमध्ये टोमॅटोचे बॉक्स होते, तर त्यामागे कांद्याची पोती लपवून तो UAE ला पाठवण्यात येत असल्याचे आढळून आले.

(हेही वाचा Haldwani Violence :  हल्द्वानीमध्ये हिंसाचार भडकावण्यामागे पाकिस्तानची टूलकिट; गुप्तचर विभागाचा अहवाल  )

8 डिसेंबरपासून कांदा निर्यातबंदी 

केंद्र सरकारने कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Farmers) निराश करणारा निर्णय 8 डिसेंबरला घेतला होता. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आले होते. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.