मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याकडे ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या दोन आरटीआय कार्यकर्त्या विरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. हेमंत कालिया (५०) आणि संतोष चौधरी (४७) असे आरटीआय कार्यकर्त्याची नावे आहेत. तक्रारदार हे मुंबई महानगर पालिकेत वरळी येथील मटेरियल टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये अधिकारी आहे. काही दिवसांपूर्वी माहिती आधिकरी कार्यकर्ते कालियाने तक्रारदार यांच्या मोबाईल फोनवर एक पीडीएफ फाईल पाठवली होती.
त्यांनी ती फाईल उघडली असता त्यांना धक्काच बसला त्या पीडीएफ फाईल मध्ये तक्रारदार यांच्या संपत्ती बाबतची सविस्तर माहिती होती. पीडीएफ पाठवणाऱ्या क्रमांकावर तक्रारदार यांनी संपर्क साधला असता, माहिती अधिकार कार्यकर्ता कालिया याचा असल्याचे समजले. दरम्यान, कालिया याने एक अर्ज तयार करून तक्रारदाराच्या वरळीतील कार्यालयात आला व त्याने तो अर्ज तक्रारदाराच्या समोर ठेवला. तक्रारदाराने तो अर्ज वाचला असता त्यात खाजगी मालमत्तेचा उल्लेख करून ती मालमत्ता भ्रष्टाचार करून मिळवली असल्याचा उल्लेख केला होता.
(हेही वाचा – BJP : भाजपकडून आमदारांच्या चार वर्षांच्या कामकाजाची मार्कशीट तयार)
तेव्हा हेमंत भरत कालीया यांनी तक्रारदार यांना सांगितले की, ” हा अर्ज सबमीट केल्यास तुम्हाला त्रास होईल, तुमची प्रतिमा धुळीस मिळेल. हे सर्व वाचवायचे असल्यास मला ३० लाख रूपये दया, मी हा अर्ज सबमीट करणार नाही असे तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वरळी पोलिसानी भारतीय दंड संहितेच्या कलम ३८९ (एखाद्या व्यक्तीला भीती दाखवून खंडणी मागणे) आणि ३४ (सह) अंतर्गत दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे, “आम्ही या प्रकरणात अद्याप अटक केलेली नाही,” असे पोलिस अधिकारी म्हणाले, “त्यांनी तक्रारदाराचे तपशील किंवा त्याच्या मालमत्तेचे तपशील कसे मिळवले हे देखील आम्ही पडताळत आहोत.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community