महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याला पदवी बनावट असल्याचे सर्वांना सांगून बदनामी करण्याची भीती घालून एका टोळीने ५५ लाख रुपयांच्या खंडणीची (Extortion) मागणी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणाचा मास्टरमाइंड रफिक मुलाणी असून त्यालाही त्याच्या इतर साथीदारांसह अटक करण्यात आली. मुलाणी व त्याच्या इतर साथीदारांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
पालिकेच्या दुय्यम अभियंत्याला पदवी बनावट असल्याचे सर्वांना सांगून बदनामी करण्याची भीती घालून एका टोळीने ५५ लाख रुपयांच्या खंडणीची (Extortion) मागणी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्याने दुखावलेले दोघे जण त्याला ठार मारणार असल्याचे सांगून ते प्रकरण मिटविण्याचा नावाखाली दोन लाख उकळले. अखेर, अभियंत्याने पोलिसांत धाव घेतल्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून तीन लाखांची खंडणी स्वीकारताना सहा जणांना अटक केली. आरोपीने चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य असल्याचे भासवून तक्रारदाराशी संपर्क साधला होता.
(हेही वाचा Assembly Election : उबाठा, शेकापमध्ये रस्सीखेच! इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरु, काँग्रेसचाही दावा)
चेंबूरला राहणाऱ्या पालिका अभियंत्याच्या तक्रारीनुसार, २७ जुलै ते २३ सप्टेंबरदरम्यान आरोपींकडून त्यांचा मानसिक छळ सुरू होता. याप्रकरणी प्रताप चौखंदरे उर्फ बबलु (४९), अभयराज पटेल उर्फ राजभाई (४८), संतोष पुजारी (४५), शेखर सकपाळ (३३), आशिवा पांडे (३३), रफिक मुलानी (४२) अशी अटक आरोपींची नावे असून ते गोरेगाव, अंधेरी आणि कांदिवलीतील रहिवासी आहे. तक्रारीनुसार, सर्वांनी तक्रारदाराला शैक्षणिक पदवी खोटी असल्याची भीती दाखवून बदनामीची धमकी दिली. तसेच, तक्रारदारांमुळे दोघे जण दुखावले असून ते हत्या करू शकतात. प्रकरण मिटविण्यासाठी त्यांनी एकूण ५५ लाखांची मागणी (Extortion) केली.
मास्टरमाइंड रफिक मुलाणी
या संपूर्ण प्रकरणामध्ये रफिक मुलाणी हा मास्टरमाइंड आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. मुलानी हा या प्रकरणातील आरोपी क्रमांक ६ आहे. यापूर्वीही त्याच्यावर अनेक ठिकाणी खंडणीसंदर्भातील (Extortion) गुन्हे दाखल आहेत. या आरोपीने यापूर्वीही महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ येथे अनेक गैरप्रकार केलेले आहेत. हा आरोपी काही अधिकाऱ्यांकडून सुपाऱ्या घेऊन प्रामाणिक अधिकाऱ्यांची बदनामी करायचा. काही फुटकळ साप्ताहिकात यासंबंधीचा वादग्रस्त व बदनामीकारक मजकूरही प्रसिद्ध करून आणायचा व त्याद्वारे अधिकाऱ्याना अक्षरश: ब्लॅकमेल करायचा. काही प्रामाणिक सरकारी अधिकारी बिचारे या ब्लॅकमेलिंगला बळी पडायचे व प्रसंगी मुलाणी याला पैसेही द्यायचे.
Join Our WhatsApp Community