Fake Bomb Call: चाळीसगाव रेल्वे स्थानकावर खोट्या बॉम्बच्या धमकीचा संदेश; आरोपीला दोन तासांत अटक

233

मध्य रेल्वे (Central Railway) आणि रेल्वे संरक्षण दलाने (RPF) महाराष्ट्रातील चाळीसगाव रेल्वे स्थानकावर (Chalisgaon Railway Station), ०९ डिसेंबर रोजी बॉम्बची धमकी देणारा संदेश पाठवल्याप्रकरणी एका व्यक्तीला अवघ्या दोन तासांत अटक करण्यात यश आले आहे.    (Fake Bomb Call)

मिळालेल्या माहितीनुसार, ९ डिसेंबर रोजी पोलीस नियंत्रण कक्षाला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब (Chalisgaon railway station fake bomb message) असल्याचा मोबाईलवर संदेश प्राप्त झाला. यासंबंधी तत्काळ तपास करणाऱ्या पथकाला आरोपीचे लाइव्ह लोकेशन आणि कॉलचा तपशील स्टेशनजवळील भागात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस पथक आणि आरपीएफ डॉग स्क्वॉड (RPF Dog Squad) यांच्या अथक प्रयत्नाने रात्री २२:३० वाजता आरोपीला अटक करण्यात आले.

(हेही वाचा – काँग्रेसचे देशविरोधी शक्तीला पाठबळ, Kiren Rijiju यांचा आरोप)

मानसिक अस्वस्थ वाटत असलेल्या आरोपी विकास एकनाथ पाटील (Vikas Eknath Patil) याने बॉम्बची धमकी देणारा फेक संदेश पाठवल्याची  कबुली दिली. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. आरपीएफ आणि शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली सतर्कता आणि जलद तपास कौशल्य दाखवून आरोपीला अवघ्या २ तासांच्या कालावधीत पकडले.

(हेही वाचा – Hindu Janajagruti Samiti च्या विरोधानंतर एम. एफ. हुसेन यांनी काढलेली देवतांची नग्नचित्रे गुपचूप हटवली)

आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने चाळीसगाव रेल्वे स्थानकावर कसून शोध घेतला. यावेळी १ ते ४ क्रमांकाचे सर्व प्लॅटफॉर्म तपासण्यात आले आणि तेथे बॉम्ब अथवा कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. तसेच याची सर्व माहिती तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली. 

हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.