Fake Currency : मुंबईत छापल्या जात होत्या १०० आणि ५० च्या बनावट नोटा; डीआयआरची कारवाई

71
Fake Currency : मुंबईत छापल्या जात होत्या १०० आणि ५० च्या बनावट नोटा; डीआयआरची कारवाई
  • प्रतिनिधी 

मुंबई शहरासह ठाणे-नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा (Fake Currency) सुळसुळाट झाला आहे. बनावट नोटा छापणाऱ्याकडून २००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटांची छपाई करून त्या किरकोळ बाजारपेठेत वितरित करण्यात येत आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) विक्रोळी पार्कसाईट येथे एका घरावर टाकलेल्या छाप्यात १०० आणि ५० रुपयांच्या बनावट नोटा (Fake Currency) आणि छपाईसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून पार्कसाईट पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : ज्ञानोबा-तुकारामांच्या मराठीला राजधानी दिल्लीचे अभिवादन; पंतप्रधानांची मराठीतून भाषणाला सुरुवात)

कुलबीर लालसिंग वाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. डीआयआरने अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून १००, ५०, २० आणि दहा रुपयांच्या १८०० बनावट नोटा (Fake Currency) आणि छपाईसाठी लागणारे प्रिंटर, संगणक इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. कुलबीर सिंग हा या नोटा एम. के. गांधींचे वॉटरमार्क असलेल्या पेपरवर मोठ्या सफाईने छापून त्याच्यावर सुरक्षा चिन्ह चिटकवून किरकोळ बाजारात त्या वितरित करीत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई सह इतर शहारातील मुख्य बाजारपेठा, लहान मोठे दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणात १०० आणि ५० रुपयांच्या बनावट नोटा (Fake Currency) आल्याच्या तक्रारी अनेक महिण्यापासून सुरू होत्या.

(हेही वाचा – Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या बदनामी प्रकरणी विकीपीडियावर गुन्हा दाखल)

डीआयआरचे एक पथक बनावट नोटा (Fake Currency) तयार करणाऱ्याच्या शोधात असताना डीआयआरच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या महितीवरून गुरुवारी सकाळी विक्रोळी पार्कसाईट येथील शिवकृपा हाउसिंग सोसायटी, लक्ष्मी निवास चाळ, आनंदगड येथील एका घरावर छापा टाकून बनावट नोटांचे (Fake Currency) रॅकेट उध्वस्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला आरोपी हा केवळ १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटा छापत होता, कारण या नोटा बाजारात सहज वितरित करता येतात, कोणाला संशय देखील येत नाही. आरोपी हा या नोटा छापून ४० टक्के कमिशनवर त्यांची विक्री करीत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.