नुकताच धुळ्यामधून देशातील सर्वात मोठा जीएसटी (GST) घोटाळा उघडकीस (Fake GST Officer Dhule) आला आहे. यामुळे GST अधिकारीही देखील चकित झाले आहेत. एक टोळी आपण GST अधिकारी असल्याचे भासवून अनेक वाहन चालकांची फसवणूक केली. या टोळीने बनावट जीएसटी अधिकारी बनून सुमारे दीड कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. या कामात एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याची देखील चर्चा सध्या रंगू लागली आहे.
(हेही वाचा – Aastha Special Train : रामलल्लाच्या जयघोषात मुंबईतून पहिली “आस्था ट्रेन” अयोध्येला रवाना)
अधिक माहितीनुसार, धुळे जिल्हा पोलिसात कार्यरत असणारे बिपीन पाटील आणि इम्रान शेख या दोघांनी मिळून बनवत जीएसटी अधिकाऱ्यांची (Fake GST Officer Dhule) टोळी बनवली. एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करून पोलीस दलातील एक वाहन ही टोळी घेऊन जायची. स्वतः GST अधिकारी आहे असे भासवायचे. त्यामुळे लोकांचा हे यांच्यावर विश्वास बसायचा. दरम्यान CCTV कॅमेऱ्याच्या टप्प्यात आपण येत नाही ना हे बघून ही टोळी वाहनचालकांकडून पैसे लुबाडायची. वाहन हे बनावट अधिकारी चालकांना GST पावती दाखवयला सांगायचे. GST थकीत हप्ता बुडवल्याचे सांगून ही टोळी त्यांच्याकडून पैसे लुबाडायची. या टोळीने आतापर्यंत सुमारे दीड कोटींची फसवणूक केली आहे. (Fake GST Officer Dhule)
(हेही वाचा – Govind Dev Giri Maharaj : ज्ञानवापी आणि मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराबाबत गोविंददेव गिरी महाराज यांचे मुसलमानांना आवाहन, म्हणाले…)
या फसवणुकीची (Fake GST Officer Dhule) व्याप्ती अजून खूप मोठी असल्याची चर्चा आहे. धुळ्यातील पोलिसांकडून सुरू असलेली ही कारवाई हिमनगाचं टोक आहे. या टोळीचा प्रमुख कोण आहे हे अजून समजू शकलेले नाही. धुळ्याप्रमाणे अन्य राज्यांमध्ये देखील अशा बनावट अधिकाऱ्यांच्या नोंदी दिसून येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाकडे जीएसटी विभागाने देखील जातीने लक्ष घातल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. (Fake GST Officer Dhule)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community