पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमली पदार्थ विक्री करण्याच्या खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वडिलांना 5 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयीन तरुणांच्या वडिलांकडून ऑनलाइन पद्धतीने 4 लाख 98 हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षाच्या मुला सह एकूण आठ संशियत लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कटातील 4 जणांना देहु रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pimpri-Chinchwad Police)
(हेही वाचा – Maratha Reservation : मनोज जरांगेंनी आंदोलनाची भूमिका घेणे उचित नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी)
देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद
पोलीस नाईक हेमंत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन शेजाळ अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत. त्यांच्यासह अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा, शंकर गोरडे, मुन्नास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी वैभवसिंग मनीषकुमार सिंग चौहान (वय 19, रा. किवळे, पुणे. मूळ रा. झारखंड) या तरुणाने देहू रोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) फिर्याद दिली आहे. या प्रकरणात अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे आणि मोहम्मद अहमेर मिर्झा या चौघांना अटक करण्यात आली आहे.
विद्यार्थ्याची पोलिसांसोबत अमली पदार्थ विक्री
पोलीस आयुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहिती नुसार, हेमंत गायकवाड, सचिन शेजाळ,अमान अमीन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा, शंकर गोर्डे, मुन्ना स्वामी,अनिल चौधरी, अशी या कटात सहभागी असलेल्या संशयित आरोपींची नावे असून हेमंत गायकवाड आणि सचिन शेजाळ हे दोघे पोलीस कर्मचारी असून सध्या देहू रोड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत, तर अमान अमीन शेख हा कॅन्टोन्मेंट बोर्डाचा माजी उपाध्यक्ष अमीन शेख याचा मुलगा आहे
फिर्यादी चौहान हा तरुण किवळे येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेतो. तेव्हा त्याची ओळख अमान याच्या सोबत झाली. आमन याने देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शेजाळ व गायकवाड यांना सोबत घेऊन पीडित विद्यार्थी अमली पदार्थ विक्री (drugs in pune) करत असल्याचा कट रचला.
(हेही वाचा – Maratha Reservation : इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा)
किवळे येथील कॅफेमधून अपहरण
देहू रोड पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार आणि अन्य आरोपींनी मिळून चौहानकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्यानुसार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजता आरोपींनी किवळे येथील एका कॅफे मधून अपहरण केले.
त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांच्या वडिलांना फोन करून कारवाईची भीती दाखवत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी वीस लाख रुपयात तडजोड करण्यासाठी धमकावले. त्या नंतर 5 लाख रुपये दोन वेगवेगळ्या अकाऊंट वर प्राप्त झाल्याने हे प्रकरण मिटविण्यात आले होते.
आठ संशयितांच्या विरोधात गुन्हा
पीडित विद्यार्थ्यांच्या वडिलांनी घडलेल्या प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविली. सध्या या कटात सहभागी असलेल्या आठ संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा (Dehurod Cantonment Board) माजी उपाध्यक्ष असलेला अमीन शेख याचा मुलगा अमान शेख, अनीला चौधरी, हुसेन डांगे , मोहम्मद अहमर मिर्झा या चारही संशयितांना देहू रोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस कर्मचारी शेजाळ आणि गायकवाडसह अन्य दोन आरोपी हे फरार असून देहूरोड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (Pimpri-Chinchwad Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community